Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

गजर भक्तीचा! शिर्डीत साई हरी नामाचा भव्य सार्वजनिक किर्तन सोहळा – ५१ वी किर्तन सेवा उत्साहात

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पावन चरणी नतमस्तक होत “शिर्डी माझे पंढरपूर” या श्रद्धेने दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला साई हरी नामाचा गजर शिर्डी नगरीत घुमत असतो. सद्गुरू श्री साईबाबांच्या कृपेने आणि ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सार्वजनिक किर्तन सोहळा यंदाही भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाच्या वातावरणात पार पडणार आहे.
या पवित्र सोहळ्यात साई व विठ्ठल भक्तीचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार असून, ह.भ.प. दिनेश महाराज कडव (रोहा, रायगड) आपल्या उर्जित, ओजस्वी आणि सुश्राव्य वाणीतून साई हरी नामाचे महत्त्व, साईबाबांची शिकवण, नामस्मरणाची शक्ती तसेच भक्तीमार्गाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यांच्या किर्तनातून भक्तांच्या मनात अध्यात्मिक चैतन्य निर्माण होऊन संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
हा ५१ वा किर्तन सेवा सोहळा बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. किर्तनासाठी साई निर्माण करिअर अॅकॅडमी ग्राऊंड, श्रीकृष्णनगर, शिर्डी हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. एकादशीचे औचित्य साधून साईनामाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या निनादात भक्तीचा अखंड प्रवाह वाहणार आहे.
किर्तनानंतर परंपरेनुसार सर्व भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात येणार असून, हा प्रसाद साईबाबांच्या कृपेचे प्रतीक मानला जातो. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भक्तिमय कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक श्री विजयराव कोते पाटील व समस्त शिर्डी ग्रामस्थ, साईभक्त शिर्डी असून, शिर्डी परिसरातील भाविकांमध्ये या किर्तन सोहळ्याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साईबाबांच्या भक्तीतून समाजात एकोपा, सद्भावना आणि नैतिक मूल्यांचा प्रसार व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
साईबाबांच्या कृपेने, विठ्ठलाच्या नामस्मरणाने आणि भक्तांच्या उपस्थितीत हा किर्तन सोहळा आध्यात्मिक उंची गाठेल, असा विश्वास भाविकांकडून व्यक्त केला जात आहे.
रामकृष्ण हरी ॥ रामकृष्ण हरी ॥ 🙏

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button