Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव

अहिल्यानगर | प्रतिनिधी
गुन्हेगारी टोळ्या व सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारत निर्णायक कारवाई सुरू केली आहे. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया वेगाने राबविण्यात येत आहेत.
याच अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूर विभाग यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ दरम्यान श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस ठाण्यांतील मागील १० वर्षांचा (२०१६ ते २०२५) गुन्हे रेकॉर्ड तपासून अत्याधुनिक ‘Crime Database’ तयार केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


📌 ‘क्राईम डेटाबेस’ ठरतोय पोलिसांचा मजबूत कणा
या डेटाबेसमध्ये गुन्हेगारांचे वय, गुन्ह्यांचे प्रकार (शरीरविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे, अंमली पदार्थ, हत्यार कायदा इ.), गुन्हे करण्याची पद्धत (Modus Operandi) तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक शांततेस धोका ठरणाऱ्या इसमांवर तात्काळ कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले आहे.
🚨 जानेवारी २०२६ मध्ये हद्दपारी प्रस्ताव पाठविण्यात आलेले आरोपी


🔹 श्रीरामपूर तालुका / शहर
योगेश सचिन गुंजाळ (वय २३), रा. गायकवाड वस्ती, बेलापूर बुद्रुक, ता. श्रीरामपूर
भारत विष्णु धोत्रे (वय ३०), रा. वार्ड क्र. ३, बाजारतळ, श्रीरामपूर
तंजील गफार खान (वय २५), रा. वार्ड क्र. ०१, हुसेन नगर, श्रीरामपूर
प्रशांत संजय थोरात (वय २७), रा. इंदिरानगर, शिरसगाव, ता. श्रीरामपूर
मनोज यशवंत पवार (वय २४), रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर


🔹 राहुरी
आरिफ गफुर शेख (वय ३२), रा. पिप्री अवघड, ता. राहुरी
अक्षय मच्छिंद्र कुसमुडे, रा. वांबोरी, ता. राहुरी
करण भारत माळी, रा. ऐकलव्य वसाहत, राहुरी
योगेश सोपान बाचकर, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी
🔹 कोपरगाव शहर / तालुका
वैभव मुकेश कुऱ्हाडे (वय २२), रा. इंदिरानगर, ता. कोपरगाव
अनिकेत गणेश जाधव, रा. गांधीनगर, ता. कोपरगाव
योगेश सुरेश गायकवाड (वय २५), रा. गांधीनगर, ता. कोपरगाव
बापू दत्तू शोधक (वय ३०), रा. सोनेवाडी, ता. कोपरगाव
संदीप दादा काळे (वय २२), रा. सुरेगाव, ता. कोपरगाव


🔹 शिर्डी
संकेत आप्पासाहेब गव्हाणे, रा. कालिकानगर, शिर्डी
संतोष बाबराव शिंदे ऊर्फ शफ्या, रा. कालिकानगर, शिर्डी
🔹 राहाता
प्रशांत जनार्दन जाधव, रा. रांजणगाव रोड, साईनगर
प्रविण नानासाहेब वाघमारे (वय २८), रा. पिंपळस
गोकुळ कारभारी मासाळ, रा. रांजणगाव खुर्द


🔹 संगमनेर शहर / तालुका
शुभम बाळू गायकवाड (वय २०), रा. साठेनगर, घुलेवाडी
सद्दाम मन्सूर शेख (वय २५), रा. सय्यद बाबा चौक, संगमनेर
संदीप संजय वाल्हेकर ऊर्फ जब्या, रा. अठरापगड वेल्हाळे
अमोल संजय जोंधळे, रा. गुंजाळवाडी
सुयोग अशोक दवांगे (वय २२), रा. हिवरगाव पावसा
सत्यम भाऊसाहेब थोरात, रा. वडगाव पान


🔹 अकोले
जनार्दन कमलाकर नवले (वय ४४), रा. नवलेवाडी, ता. अकोले
🔹 घारगाव
आण्णासाहेब सूर्यभान वाडगे (वय ४५), रा. घारगाव
🔹 नेवासा (टोळी)
शुभम विश्वास ऊर्फ विश्वनाथ गजे (वय २९) – टोळी प्रमुख, रा. वडुले
आकाश ऊर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत (वय २५) – टोळी सदस्य
योगेश मच्छिंद्र सावंत (वय २८) – टोळी सदस्य
धनंजय सुनील काशीद, रा. नेवासा बुद्रुक
यासीन गणी शेख, रा. सलाबतपूर, ता. नेवासा


👮‍♂️ पोलीस पत्रकात नमूद मार्गदर्शक अधिकारी
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे,
अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी – श्री. जयदत्त भवर (श्रीरामपूर), श्री. अमोल भारती (शिर्डी), श्री. कुणाल सोनवणे (संगमनेर), श्री. निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


👮‍♂️ कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी / कर्मचारी
पो.नि. नितीन देशमुख, स.पो.नि. गणेश जाधव, स.पो.नि. रामचंद्र शिखरे, पो.स.ई. दादाभाई मगरे, पो.स.ई. अप्पासाहेब हंडाळ, पो.नि. अरुण धनवडे, पो.नि. संजय ठेंगे, स.पो.नि. सुदाम शिरसाठ, पो.नि. रामकृष्ण कुंभार, पो.नि. रणजित गलांडे, पो.नि. नितीन चव्हाण, म.स.पो.नि. संगीता गिरी, पो.नि. प्रविण साळुंके, पो.नि. मोहन बोरसे, पो.नि. महेश पाटील, तसेच विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.


⚠️ कडक इशारा
समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५, ५६ तसेच नवीन फौजदारी कायद्यांनुसार पुढेही अधिक कडक व जलद कारवाई सुरू राहणार आहे, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button