Letest News
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल
अ.नगरराजकीय

राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू असताना भुजबळ तडकाफडकी निघून गेले

शिर्डी ( प्रतिनिधी) आगामी येणाऱ्या निवडणुका महायुती म्हणून लढू! काही तडजोडी कराव्या लागतात, पुढचे पाच वर्ष महायुती टिकवायचे आहे .असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय अधिवेशन होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल शिर्डीत आले असता ते मध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आमच्या पक्षाची यापुढे दिशा , विचारधारा काय राहिल.याबाबत या अधिवेशनात चर्चा होईल. पुढच्या निवडणुका आहेत‌. तिथे महायुती म्हणून निवडणुक लढू!.

काही छोट्या निवडणुकांमध्ये तेथील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून लढता येईल.काही तडजोडी कराव्या लागतात. पुढचे पाच वर्ष महायुती टिकवायची आहे, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळांच्या नाराजीवरही भाष्य केलं. माझी आणि भुजबळ यांची भेट झाली. तो आमचा कौटूंबिक प्रश्न आहे.

टोकाची नाराजी नाही , निश्चित ते पक्षाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं मार्गदर्शन पक्षाला गरजेचे आहे. आम्ही परिवार म्हणून सोबत आहोत, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. दिल्ली निवडणुकीत नवीन सरकार येईल. भाजपा तेथे चांगली ‌कामगिरी करेल, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आमदार खासदार सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. या संपूर्ण परिसराला यशवंतराव चव्हाण नगरी असं नामकरण करण्यात आलं आहे. शिबिराचा ठिकाणी भव्य स्टेज तयार करण्यात आलं असून अजित पवारांची आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button