Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

हत्या होऊनही आरोपी फरार, पोलिस गप्प! राहाता पोलिसांवर पाठीशी घालण्याचा आरोप-कायद्याचा वचक कुठे?

शिर्डी | प्रतिनिधी
“वेळेवर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते, तर आज माझा भाऊ जिवंत असता!”
हा आक्रोश आहे सचिन स्थानराव गिढे या तरुणाच्या कुटुंबीयांचा, ज्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि मृतदेह गोदावरी नदीत फेकून देण्यात आला.
या गंभीर प्रकरणात राहाता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळेच आरोपींचे फावले, असा थेट आरोप आता पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी मृताचा भाऊ अमोल स्थानराव यांनी सामाजिक नेते मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे कडक शब्दांत निवेदन सादर करून न्यायासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
🟥 अपहरणाची माहिती असूनही ‘मिसिंग’ची नोंद!
घटना घडताच सचिन गिढे यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन
➡️ पतीचे अपहरण झाल्याची स्पष्ट माहिती दिली
➡️ संशयित आरोपींची नावेही सांगितली
मात्र तरीही, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ ‘मिसिंग’ची नोंद करून गंभीर दुर्लक्ष केले.
या हलगर्जीपणामुळे आरोपींना पुरावे नष्ट करण्यास व हत्या करण्यास वेळ मिळाला, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
🟥 हत्या होऊनही पोलिसांचा संथ तपास
10/12/2025 रोजी सचिन गिढे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट असतानाही
➡️ 11/12/2025 रोजी उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल
➡️ तपास अपूर्ण असतानाही काही आरोपींना CR-20 अंतर्गत लाभ
➡️ मुख्य आरोपींपैकी प्रवीण नानासाहेब वाघमारे आजतागायत फरार
➡️ तरीही पोलिसांकडून अटक नाही
या साऱ्या बाबींमुळे आरोपींना पाठीशी घालण्याचा गंभीर संशय बळावत आहे.
🟥 “ही हत्या नव्हे, तर यंत्रणेचा खून!”
पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की,
ही घटना केवळ एका तरुणाची हत्या नसून
👉 पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा बळी
👉 कायद्याच्या अंमलबजावणीतील अपयश
👉 गरीब कुटुंबाच्या न्यायाचा खून
आहे.
🟥 कुटुंबाच्या ठाम मागण्या
पीडित कुटुंबाकडून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
🔴 सर्व आरोपींना तात्काळ अटक
🔴 फरार आरोपी प्रवीण वाघमारे यास त्वरित जेरबंद करणे
🔴 सर्व आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई
🔴 अमानुष हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा
🔴 अपहरण असूनही गुन्हा नोंद न करणाऱ्या व तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई
🟥 सवाल जनतेचा : पोलिस कुणाच्या बाजूने?
या प्रकरणामुळे राहाता–शिर्डी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
“पोलिस वेळेवर काम करत नाहीत, आरोपी मोकाट फिरतात आणि निरपराध मरतो”
असा रोखठोक सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button