Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून ठार केले आरोपी विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून ठार केले आरोपी विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

निमगाव परिसरातील शिवराज चव्हाण याने कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून ठार केल्याने त्यावर सुवर्णा विश्वनाथ उदावंत वय 37 वर्षे व्यवसाय सरकारी नोकरी (महाराष्ट्र शासन मानद पशु कल्याण अधिकारी) रा. निमगाव को-हाळे ता. राहाता जि. अहिल्यानगर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे

DN SPORTS

kamlakar

त्यात उदावंत यांनी फिर्याद दिली आहे कि  दि. 31/05/2025 रोजी रात्री 08/13 वा. चे सुमारास माझा मोबाईल नंबर 9405570011 यावर संदीप दिलीप ठाकरे यांचा मोबाईल मो. 7620343173 या नंबर वरुन फोन आला व ते मला म्हणाले की, आमचे राहते घर ठाकरे गल्ली महादेव मंदीराजवळ, हेलीपॅड रोड, निमगाव येथे आमचे घरासमोर असणा-या एका कुत्र्याला आमचे गल्लीत राहणारे इसम नामे शिवराज धर्मराज चव्हाण याने डोक्यात पेव्हर ब्लॉक घालुन मारुन टाकले आहे.

तरी तुम्ही या ठिकाणी येवुन चौकशी करुन पुढील कार्यवाही करा असे कळविल्याने मी लगेच ठाकरे गल्ली महादेव मंदीराजवळ, हेलीपॅड रोड, निमगाव येथे घटना घडले ठिकाणी गेले व बघितले असता अशोक आत्माराम निकम यांचे राहते घरासमोर पांढ-या रंगाचा कुत्रा त्याचे डोक्याला मार लागलेला व तोंडातुन रक्त येवुन मृत अवस्थेत दिसला.

तेव्हा मी तेथे हजर असलेले ।) विलास प्रकाश ठाकरे 2) वामन भास्कर ठाकरे 3) प्रविण सुभास ठाकरे 4) नितीन गुलाब बावीसकर यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही सर्वानी पाळलेला पांढरे रंगाचा कुत्रा वय अंदाजे 10 वर्ष हा रात्री 08/00 वा चे सुमारास अशोक आत्माराम निकम यांचे घरासमोर झोपलेला असतांना शिवराज धर्मराज चव्हाण रा. निमगाववाडी, निमगाव को-हाळे ता. राहाता हा तेथे आला

व तेथे पडलेला पेव्हर ब्लॉक घेवून आला व सदर कुत्र्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारुन सदर कुत्र्यास मारुन टाकले आहे. म्हणुन माझी शिवराज धर्मराज चव्हाण रा. निमगाववाडी, निमगाव को-हाळे ता. राहाता याचेविरुद्ध कायदेशिर फिर्याद दिली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button