Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
क्राईमशिर्डी

श्रद्धेच्या नावावर लूट अजूनही सुरूच! जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी यंत्र विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत

शिर्डीमध्ये साईभक्तांची फसवणूक पुन्हा डोके वर काढतेय : २०१७ मध्ये कारवाईनंतर गायब झालेले यंत्र विक्रेते  पुन्हा सक्रिय; कायमस्वरूपी आळा कधी?

sai nirman
जाहिरात

शिर्डी : साईनगरीत दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या अवैध कमिशन एजंटांविरोधात सण २०१७ साली पोलिस विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचे सत्र सुरु  करावे या कारवाईबद्दल चावडी कट्टा हेल्पिंग हँड यांच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व फौजदार संदीप कहाळे यांचा सन्मान करण्यात आले होते  त्या वेळी चावडी कट्टा हेल्पिंग हँड यांच्या पुढाकारातून चावडी कट्टाचे विलास कोते, भाऊ भोसले, सचिन तांबे, सचिन शिंदे, प्रमोद गोंदकर, दत्तात्रय गोंदकर, दिलीप कोते,

DN SPORTS

kamlakar

ज्ञानेश्वर गोंदकर, नारायण थोरात, दीपक वारूळे, मच्छिंद्र शेळके, तान्हाजी गोंदकर, सर्जेराव कोते, डॉ. सुनील कथले, अरुण सहारे, विजय थोरात, दादा काळे, केशव गोंदकर, बापू ठाकरे, भास्कर जगताप, राजेंद्र गोंदकर आदी सदस्य पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्या कालावधीत अनेक गुन्हे दाखल झाले, कारवाया तीव्र झाल्या आणि काही काळ हे अवैध यंत्र विक्रेते पूर्णतः गायब झाले होते.

मात्र काही वर्षांपासून हेच एजंट नव्या पद्धतीने, नव्या चेहऱ्यांनी पुन्हा डोके वर काढत असल्याचे वास्तव समोर आले आहे. दोन रुपयांचे साईयंत्र १५०० रुपयांपर्यंत विकून आमिष दाखवून भक्तांना भावनिक करून भाविकांची सर्रास आर्थिक लूट सुरू आहे.

मात्र जागरूक नागरिकांचा सवाल आता अधिक तीव्र झाला आहे —
२०१७ मध्ये कडक कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले, विक्रेते गायब झाले…
मग आता नेमकी परिस्तिथी का नेमकि बदलली ?

❓

तात्पुरत्या कारवायांनी प्रश्न सुटतो का?

❓

हे अवैध एजंट पुन्हा पुन्हा कसे उभे राहतात?

दरम्यान, हे यंत्र अव्वाच्या सव्वा दरात विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कोणी तक्रारदार पुढे न आल्यास पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी चावडी कट्टा व जागरूक ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्ह्याला कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघाचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे ए पी आय सागर काळे यांच्यासारखे खमके अधिकारी लाभले असून, त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत साईनगरीत श्रद्धेच्या नावावर सुरू असलेल्या फसवणुकीला कायमचा आळा घालावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

🙏

कारवाई नव्हे, सातत्य हवे… मोहीम नव्हे, ठोस धोरण हवे — तरच साईनगरीतील फसवणूक कायमची थांबेल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button