Letest News
लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद
शिर्डी

निवडणुकीचे वृत्तांकन करतांना आजतक वृत्तवाहिनीचे व्हिडीओ जर्नलिस्टच निधन,पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त

बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबाजोगाई शहरात आलेले ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव कनगुटकर यांचे दुःखद निधन झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज (सोमवारी) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनाने पत्रकारिता विश्वासह कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

kamlakar

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांच्यासह वरिष्ठ कॅमेरामन वैभव कनगुटकर गेले होते.

अंबाजोगाई येथील राज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते.सकाळी हॉटेलमधून ते निघाले, त्यांनी एका वॉकथ्रूचे शूट केले. मात्र त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याने ते गाडीत बसले. मात्र त्यातच त्यांचा करुण अंत झाला.

अत्यंत शांत, संयमी आणि मृदूभाषी स्वभावाचे म्हणून वैभव कनगुटकर कुटुंब, सहकारी आणि मित्र परिवारामध्ये परिचित होते. ते ठाण्यात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंब, सहकारी शोकसागरात बुडाले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button