Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरशिर्डी

श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत त्‍वचा रोग तपासणी व उपचार शिबीरास उत्‍सफुर्त प्रतिसाद

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट, म्‍हैसुर यांचे संयुक्‍त विद्यमाने मोफत त्‍वचारोग तपासणी शिबीर दिनांक दि.२४/१०/२०२४ ते दि.२६/१०/२०२४ या दरम्‍यान श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे आयोजीत करण्‍यात आलेले होते. या शिबीरात तीन दिवसात १२७२ रुग्‍ण सहभागी झाले यातील सर्व रुग्‍णांवर मोफत त्‍वचारोग तपासणी होवुन उपचार झालेल्‍या रुग्‍णांना मोफत औषधे वाटप करणेत आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यामधील १५३ रुग्‍णांवर प्रोसिजर करणेत आल्‍या. यामध्‍ये Fungal Infection, Acne, Skin Tags, Hair fall Eczema, Melasma या सारख्‍या आजारांवर उपचार करणेत आले. यावर विविध प्रकारच्‍या मेडीकल प्रोसिजर देखील विविध उपकरणे व साहित्‍यांच्‍या सहाय्याने करणेत आल्‍या. यामध्‍ये प्रामुख्‍याने Chemical Pealing, Cautery, PRP treatment, IPL या सारख्‍या प्रोसिर्जचा समावेश आहे . अशा प्रकारचे त्वचारोगावरील मोफत तपासणी व उपचार शिबिर संस्थान रुग्णालयामध्ये प्रथमच आयोजित झाले असल्यामुळे ह्या शिबीरास रुग्‍णांनी उत्‍सफुर्त असा प्रतिसाद दिला.


सदर शिबीरात जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांची तपासणी व्‍हावी व उपचार मिळावे याकरीता श्री साईनाथ रुग्‍णालयातील त्‍वचारोग तज्ञ डॉक्‍टर डॉ.दादासाहेब कांबळे, सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा चॅरीटेबल ट्रस्‍ट, म्‍हैसुर येथील त्‍वचारोग तज्ञ डॉ.शिवाणी एस.आर., डॉ.हंमसा सी.एन. यांच्‍या समवेत श्री साईनाथ रुग्‍णालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


कमी कालावधीत जास्‍तीत जास्‍त रुग्‍णांची तपासणी व उपचार करुन शिबीर यशस्‍वी केल्‍याबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी शिबीराकरीता अहोरात्र काम करणा-या टीमचे अभिनंदन केले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थान रुग्‍णालयाचे प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे,

प्र.वैद्यकीय अधीक्षक डॉ.मैथिली पितांबरे, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, प्र.सहा.अधिसेविका नजमा सय्यद, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांच्यासह श्री साईनाथ रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. शिबीरात आलेल्‍या सर्व लाभार्थी रुग्‍णांनी मोफत तपासणी, उपचार व मोफत औषधे दिलेबद्दल श्री साईबाबा संस्‍थानचे विशेष आभार व्‍यक्‍त केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button