Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
क्राईमशिर्डी

परराज्यातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार काही थांबेना,पुन्हा एका महिला भाविकांची तब्बल तीन लाखांची सुवर्ण चैन लंपास

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथे आपल्या पती व नातेवाईकांना बरोबर घेऊन साई दर्शनासाठी आलेल्या अण्णापूर्णा नरेंद्र गुप्ता वय ५० व्यवसाय मोबाईल विक्री राहणार बोधन जिल्हा निजामाबाद या तेलंगणा राज्यातील महिला साई भक्त ५ मे रोजी हॉटेल काशी अन्नपूर्णा सत्र येथे थांबलेले होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

सकाळी सहा वाजेच्या सुमारास सदरची महिला तिचा पती व नातेवाईक नाश्ता करण्यासाठी हॉटेल हॉलिडे पार्क समोरून सकाळी सहा वाजेच्या सुमारास जात असताना नगर मनमाड रोड राहता दिशेने सुसाट आलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सरवर दोन तरुण होते त्यांनी फिकट हिरव्या रंगाचा फुल बाईचा शर्ट व पुढे बसलेल्या तरुणांनी तोंडाला पांढरा रंगाचा रुमाल बांधलेला होता

kamlakar

त्यांनी माझ्या गळ्यातील ७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन लाख ८० हजार रुपये किमतीचे पॅडल पाठीमागे बसल्या तरुणाने ओरबडून नेल्याची तक्रार साईभक्त महिला अण्णापुर्णा नरेंद्र गुप्ता वय ५० राहणार बोधन निजामाबाद राज्य तेलंगणा या सदर महिलेने शिर्डी पोलिसात दाखल केल्यामुळे शिर्डी पोलिसांनी अज्ञात दोन तरुणांच्या विरोधात भादवी ३४,३९४ गुन्हा दाखल केला आहे काही दिवस बंद झालेले या धुमस्टाईल चोऱ्या पुन्हा सुरू झाल्या असून

या चोरट्यांच्या रडारवर आंध्रप्रदेश तेलंगणा या राज्यातील साईभक्त महिला असल्याचे दिसून येते पर राज्यातील या साईभक्त महिला साईबाबांच्या निसिम भक्त असल्याने दर्शनाच्या इच्छेने या महिला कधी पहाटे व सकाळीच अन्नछत्रंम मधून बाहेर पडतात त्याचवेळी हे धूमस्टाईलचे चोर आपले सावज शोधून धुमस्टाईलने चोरी करत असल्याचे दिसून येतात व भरधाव वेगाने पळुन जातात या महिलांच्या गळ्यात असलेल्या सोन्याच्या साखळ्या व पॅडल याचे वजन किमान पाच ते सात तोळे या दरम्यान असल्यामुळे हे चोरटे परराज्यातील महिला साईभक्तांना आपले सावज करत असून

ज्या साईभक्तांवर असा प्रसंग ओढावतो ते साईभक्त मोठ्या प्रमाणावर भयभीत झालेले असतात सरकारी भावाप्रमाणे जरी किंमत दोन लाख ८०हजार असली तरी आजच्या बाजारभावाप्रमाणे किमान चार लाख रुपयांच्या सोन्याचा फटका या साईभक्तांना बसल्यामुळे या महिलेला अश्रू अनावर झाले होते आपल्या नशिबाला दोष देत हे कुटुंब आपल्या राज्यात निघून गेले या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button