शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी मध्ये साईप्रसादालया समोरील खाजगी पार्किंग मध्ये रात्री अंधारामध्ये संशयास्पद फिरत असलेल्या दोन इसमांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती कि,दि. 14/01/2025 रोजी चे 2000 पासून ते दि. 15/01/2025 रोजी चे सकाळी 08 -00 वा या कालावधीत मी व पोकाँ धनेधर, पोसई ठाकुर पोना उजागरे असे सरकारी जिप नं.MH16 BY1100 हिमध्ये नविन प्रसादालयासमोरुन पेट्रोलिंग करत असतांना दि. 14/01/2025 रोजी 23/45 वा चे सुमारास आम्हाला श्री साईबाबा प्रसादालयासमोरील गोपिनाथ गोंदकर यांचे पार्कीगमध्ये अंधारात दोन इसम संयशयास्पदरीत्या तेथे फिरतांना दिसले.
ते आम्हाला पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अमोल दिलीप डुकरे वय 32 वर्षे रा. दाढ बुद्रुक ता. राहाता व 2) शाम दत्तु शिंदे वय 23 वर्षे रा. सितानगर, शिर्डी ता. राहाता असे असल्याचे सांगितले. तुम्ही पार्कीगमध्ये ट्रॅव्हल्स गाड्यांजवळ अंधारात काय करत होता अशी त्यांचेकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले.
यावरून आमची खात्री झाली की सदर इसम अंधाराचा फायदा घेवून सुर्यास्त ते सुर्योदयादरम्यान चोरी करण्याचे उद्देशाने फिरत होते. म्हणून माझी त्याचे विरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे फिर्याद आहे. या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.