Letest News
राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ “इतना सन्नाटा क्यूँ छाया है…?” खरात प्रकरणात नेमकं कोणाला वाचवलं जातंय? समता पतसंस्थेतील व्यवहारांवर... राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद”
क्राईमशिर्डी

हाॅटेलवर दगडफेक व मारहाण करणाऱ्या तीन तरुणांवर गुन्हा दाखलशिर्डी शहरातील खळबळ जनक घटना

शिर्डी प्रतिनिधी/शिर्डी शहरा लगत असलेल्या शिर्डी पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर मनमाड रोडवरील हॉटेल वृंदावन येथे २५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून हॉटेलमध्ये येऊन सुनील सिताराम शिंदे वय ३३ व्यवसाय हॉटेल मॅनेजर शिर्डी व त्याचा मित्र ऋषिकेश रवींद्र सागर या दोघांना मारहाण केली ऋषिकेश सागर हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला असता त्यास देखील मारहाण करून शिव्या करत जखमी केले त्याबरोबरच हॉटेल बाहेर उभे असलेल्या मोटरसायकली मोठ्या प्रमाणावर ढकलून देऊन वाहनांचे नुकसान केले तसेच हॉटेलवर जोरदार दगडफेक करत आर्थिक नुकसान केले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

फिर्यादी व मित्रास जीवे मारण्याची धमकी दिली व हॉटेलमध्ये ग्राहक असताना दहशत निर्माण केली त्यामुळे काही हॉटेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही वेळ नगर मनमाड रोडवर मोठी गर्दी झाली होती त्यामुळे साईभक्त भाविकांच्या मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते मॅनेजर सुनील सिताराम शिंदे वय ३३ रा शिर्डी यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून

kamlakar

शिर्डी पोलिसांनी आरोपी अविनाश तुकाराम भाडाईत राहणार राहता ऋषिकेश विजय पारधे राहणार शिर्डी अजय भाऊसाहेब अहिरे राहणार निमगाव शिर्डी या तिघांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी या तिघांच्या विरोधात भादवी ३२४, ३२३, ५०४ ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहे शिर्डी व परिसरात असलेल्या हॉटेल चालकांना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा नेहमीच त्रास होत असतो हॉटेलचे बिल न देणे गोंधळ घालणे दमबाजी करणे शिवीगाळ करणे वेळप्रसंगी मारहाण करणे धाक दाखवणे जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार वाढल्यामुळे शिर्डी परीसरात हाॅटेल व्यवसाय करणे अडचणीचे झाले असून अगोदरच गर्दी नसल्याने हा हाॅटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे

त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा व हॉटेल व्यवसायिकांना न्याय द्यावा अशी मागणी थेट जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याकडे निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते व राहता बाजार समितीचे माजी संचालक शरद मते व काही व्यावसायिकानी केली असुन लवकरच यासाठी एक शिष्टमंडळ महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे खा डॉ सुजय विखे. व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भेटून अडीअडचणी कानावर घालणार असल्याचे शरद मते यांनी. सांगितले शिर्डी विभागाचे डि वाय एसपी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली. शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांनी गंभीर दखल घेतली असून घटने प्रंसगी भांडण करत असलेल्या तरुणाचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे यात कोणी आणखी तरुणाचा सहभाग आहे

या अनुषंगाने शिर्डी पोलीसानी अधिक तपास सुरू केला आहे जर अशा प्रकारे कोणी तरुण हाॅटेल व्यावसायिक व्यापारी यांना त्रास देत असतील तर अशा तरुणांची माहिती देण्यासाठी व्यावसायिकानी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे या तरुणाचा तपास सुरू असुन लवकरच जेरबंद करण्यात येतील अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button