Letest News
शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ-
अ.नगरक्राईम

लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात

लोणी / प्रतिनिधी
लोणी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी एका डॉक्टरसह दोन एजंटांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण राहाता तालुक्यात खळबळ उडाली असून, आणखी काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना दि. २९ एप्रिल रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, पिंपरी निर्मळ येथील निळवंडे कालव्याजवळील एका खोलीत गर्भवती महिलांकडून तब्बल दहा हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात आहे. त्यानुसार लोणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून छापा टाकला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या कारवाईत आधी अटक करण्यात आलेले डॉ. राहुल भनगे आणि अभिजीत भुसाळ यांच्याकडून तब्बल २४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सोनोग्राफी मशीन, मोबाईल फोन, ५९ हजारांची रोकड, तीन चारचाकी वाहने आणि वैद्यकीय तपासणी साहित्याचा समावेश आहे.पुढील तपासात या रॅकेटमध्ये एजंटमार्फत डॉक्टर आणि गर्भवती महिलांचा संपर्क घडवून आणला जात असल्याचे उघड झाले. त्यानुसार प्रदीप ढगे आणि निलेश भवर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी प्रदीप ढगे याच्याकडून लिंगनिदानासाठी वापरले जाणारे आणखी एक मशीन जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, चौकशीतून डॉ. रविंद्र कुटे यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.


नव्याने अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना आज राहाता न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या कारवाईत डॉक्टर, एजंट, दलाल तसेच संबंधित महिलांच्या कुटुंबीयांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, अशी व्यापक कारवाई प्रथमच झाल्याची चर्चा सुरू आहे. तपासादरम्यान पुण्यातील काही डॉक्टर आणि एजंटांचाही सहभाग समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही धडक कारवाई मुम्मका सुदर्शन, सोमनाथ वाघचौरे आणि जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.“गर्भलिंग निदानावर कायद्याने बंदी असतानाही सुरू असलेल्या या रॅकेटमुळे प्रशासन हादरले असून, राहाता परिसरातील आणखी काही डॉक्टर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button