Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
राजकीयशिर्डी

शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद

राहाता : मुंबई, ठाणे, नाशिकसह गुजरात येथील साईभक्तांना शिर्डीसाठी सर्वांत जवळचा ठरणारा सायाळे-जवळके मार्गे रस्ता तसेच ओझर ते शिर्डी विमानतळासाठी वेगवान ठरणाऱ्या १० मीटर रुंद मार्गासाठी सरकारने आगामी सिंहस्थ पर्वणीतून २१३.५७ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती जवळके येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी दिली. या निधीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी लढा उभारला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ काळात राज्य व केंद्र सरकारने नजिकचे तीर्थक्षेत्र आणि देवस्थाने जोडण्यासाठी ३० हजार कोटींची तरतूद केली आहे. तर नांदूर, निमोण, तळेगाव दिघे, लोहारे, निर्मळ पिंपरीमार्गे शिर्डीला येणाऱ्या रस्त्यासाठी तरतूद केली होती. मात्र, शिर्डीसाठी सर्वांत जवळचा ठरणारा व दुष्काळी भागाला वरदान ठरणारा हा मार्ग वगळला होता.
पूर्वी हा मार्ग जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यासाठी १९९५ साली जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर हा रस्ता डांबरीकरण झाला. या रस्त्यावरून शिर्डीसाठी जाणाऱ्या पालख्या आणि प्रवासी वाहने सर्वाधिक संख्येने जात असताना हा रस्ता दुपदरी होता. मात्र, सिंहस्थ पर्वणीतून या रस्त्यासाठी तरतूद झाली नव्हती.


या रस्त्यानजिक असलेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामसभांचे ठराव घेऊन सरकारकडे या रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. अखेर या लढ्याला यश आले. यासाठी सरकारने हा मार्ग ओझर विमानतळ ते शिर्ड विमानतळ या मार्गात ८५.५० किमीचा रस्ता समाविष्ट करून त्यासाठी २१३.५७ कोटी रुपयांची तरतूद केली.
हा रस्ता वर्तमानात ५..५० मीटन रुंदीचा असून, तो आता तब्बल १८ मीटर रुंदीचा होणार असल्याने ओझर विमानतळ ते शिर्ड (काकडी) विमानतळ या मार्गाने प्रवाशांना केवळ दोन तासांत पोहचता येणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button