Letest News
मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप गोर-गरिबांच्या शिक्षणासाठी कोटभर रुपयांची जागा दान-अशोक तुरकणे यांचे दातृत्व ठरले पिंपळवाडीच्या भवित... ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांना पूर्णविराम-उद्धव ठाकरेंसमोर खासदारांच्या शपथा शिर्डीत भरदिवसा चैन स्नॅचिंगचा थरार-महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून दुचाकीवरून चोरटे पसार
क्राईमशिर्डी

बसस्थानकात दुचाकी चोरीचा प्रयत्न-कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने कट उधळला

शिर्डी शहरात पोलीस व सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय ठरल्याचा संताप व्यक्त होत असतानाच बसस्थानक परिसरात दुचाकी चोरीचा थरार उघडकीस आला. शिर्डी पोलीस, नगर परिषद विशेष पथक आणि शिर्डी वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीतच चोरट्यांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संस्थान व बसस्थानक कर्मचाऱ्यांची सतर्कता; एक आरोपी जेरबंद
तीन चोरटे बसस्थानक परिसरात आले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र श्री साईबाबा संस्थान कर्मचारी आणि बसस्थानक कर्मचाऱ्यांनी ही बाब ओळखत तत्काळ त्यांना हटकले. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


एकाच दिवशी ५-६ दुचाकी चोरी; टोळीचा संशय

धक्कादायक बाब म्हणजे याच दिवशी संध्याकाळी शिर्डी शहरातून ४ ते ५ दुचाकी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तर बिरोबाबन परिसरातूनही एक मोटारसायकल लंपास झाली. पोलिसांनी निमगाव-निघोज येथील एका युवकाला ताब्यात घेतले असून ही एकट्याची कृती की टोळी कार्यरत आहे याचा तपास सुरू आहे.CCTV वाढवले; MSF तैनातीची मागणी जोरात
घटनेनंतर तातडीने संस्थान प्रशासनाने बसस्थानक परिसरात CCTV कॅमेरे वाढवून सुरक्षा कडक केली आहे. तरीही भाविक, प्रवासी आणि स्थानिकांच्या वाहनांची सुरक्षा धोक्यात असल्याने MSF (महाराष्ट्र सुरक्षा बल) कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करण्याची मागणी जोर धरत आहे.
👉 शिर्डीत दुचाकी चोरट्यांचा उच्छाद वाढत असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button