Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
Blog

“चोराच्या उलट्या बोंबा! ‘भक्त’ ते ‘बचावकर्ते’—काका कोयटे यांची थरारक पलटी” सरकारचा थेट इशारा | महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय

कोपरगाव | प्रतिनिधी
कोपरगाव-शिर्डी परिसरात सध्या एकच चर्चा रंगली आहे—“चोराच्या उलट्या बोंबा!” कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना, काका कोयटे यांच्या भूमिकेने आता संपूर्ण प्रकरण अधिकच संशयास्पद बनवले आहे.
कालपर्यंत ज्या व्यक्तीने कॅप्टन खरात यांचा नाशिकमध्ये जंगी सत्कार केला, सार्वजनिक कार्यक्रमात त्यांच्या पाया पडून निष्ठा दाखवली, तोच काका कोयटे आज अचानक “मी त्यांचा भक्त नाही” असा कांगावा करताना दिसत आहे. या नाट्यमय बदलामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


विशेष म्हणजे, कोपरगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काका कोयटे यांनी स्वतः कबुली दिली होती की, त्यांनी एका “मोठ्या भविष्यकारा”ची भेट घेतली होती. या तथाकथित भविष्यकाराच्या सल्ल्यावरूनच त्यांनी कॅप्टन खरात यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. यानंतर खरात यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पतसंस्थेमध्ये शेकडो खाती उघडण्यात आली—ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
स्थानिक सूत्रांच्या मते, ही खाती केवळ कागदोपत्री असून, त्यामागे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. केवायसी प्रक्रियेत अनियमितता, एकाच व्यक्तीकडे अनेक कागदपत्रे, आणि संशयास्पद व्यवहार—या सर्व बाबींमुळे हा घोटाळा आणखी खोलवर जाण्याची शक्यता आहे.


मात्र, कॅप्टन खरात यांना अटक होताच काका कोयटे यांनी तात्काळ भूमिका बदलली. “मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली” अशी भूमिका घेत त्यांनी स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परवा कोपरगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आपण खरात यांचे समर्थक नसल्याचा दावा केला.
परंतु, जनतेच्या स्मरणशक्तीवर पडदा टाकणे इतके सोपे नाही. कालपर्यंतचा सत्कार, सार्वजनिक जवळीक, आणि स्वतः दिलेल्या कबुल्या—हे सर्व पुरावे अजूनही ताजे आहेत. त्यामुळे “आधी भक्ती, आता बचाव” असा टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणात काका कोयटे यांची भूमिका आता तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. जर तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केली, तर बोगस खात्यांचा खेळ, आर्थिक देवाणघेवाण आणि त्यामागील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नागरिकांकडून एकच मागणी जोर धरत आहे—
“खरातच नाही, तर त्याला साथ देणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे!”
आता पुढे तपासात काय उघड होते, आणि काका कोयटे यांची खरी भूमिका काय होती, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button