Letest News
श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं...
क्राईमशिर्डी

शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्री

………..: शिर्डी : सध्या राज्यात एलपीजी गॅस टंचाईचे वातावरण असताना शिर्डी शहरात मात्र गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक चर्चा सर्वत्र सुरू आहे. घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलेंडर हॉटेल, ढाबे आणि छोट्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये सर्रास वापरले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे ९०० रुपयांना मिळणारा घरगुती सिलेंडर काही ठिकाणी तब्बल २ हजार रुपयांना विकला जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तहसील पथकाची पहिल्याच दिवशी कारवाई
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर गॅसच्या साठेबाजी व काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका प्रशासनाने तपास मोहीम सुरू केली. तहसील कार्यालयाच्या पथकाने शहरातील काही भागात अचानक पाहणी करून कारवाई केली. या कारवाईत काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांना समज देत पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला असल्याची माहिती मिळाली.


पुरवठा विभागाचे दुर्लक्ष?
मात्र तहसील पथकाने कारवाई केल्यानंतरही गॅसचा गैरवापर थांबलेला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुरवठा विभागाकडून या प्रकाराकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांनंतरही शहरात उघडपणे घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


मंदिर परिसरात हातगाड्यांवर घरगुती गॅसचा वापर
शिर्डीच्या मंदिर परिसरात असलेल्या अनेक छोट्या हातगाड्या, चहा-नाश्त्याच्या गाड्या आणि फास्टफूड विक्रेत्यांकडून घरगुती एलपीजी सिलेंडरचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. नियमांनुसार व्यावसायिक वापरासाठी वेगळे कमर्शियल सिलेंडर घेणे बंधनकारक असताना हा नियम सर्रास पायदळी तुडवला जात असल्याचे चित्र आहे.

गणेश गॅस एजन्सीकडून पुरवठा सुरळीत असल्याचा दावा
दरम्यान, शहरातील गणेश गॅस एजन्सीकडून नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. तरीही बाजारात सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही जण काळाबाजार करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

काळाबाजार थांबवण्यासाठी कडक कारवाईची मागणी
शिर्डीमध्ये सुरू असलेल्या या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत नियमित तपासणी मोहीम राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर तात्काळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


प्रशासनाची भूमिका काय?
शिर्डीमध्ये सुरू असलेला गॅसचा काळाबाजार थांबवण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही तर गॅस टंचाईच्या काळात काळाबाजार अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button