Letest News
रस्त्याकडेला उभ्या महिलेवर डोळा-पिंपळवाडी–रुई मार्गावर संतापजनक प्रकार दोन हजारांचे आमिष दाखवत विवाह... #MaharashtraPolice#CrimeNews# BreakingNews#शिर्डीत 29 लाखांचा प्रतिबंधित मागुर मत्स्यबिज ट्रक जप्त ... CrimeNews #LocalNews शिर्डीत तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; वीर, वायदंडे यांच्यासह ७ जणांवर गुन्हा राहाता शहरात पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी ग्रो मोअर फायनान्स-1.50 कोटी खंडणीचा महाभंडाफोड! निलंबन पुरेसे नाही — थेट गुन्हा दाखल करा-उच्च न्या-... crime news # पोलीसांनीच पोलिसांवर गुन्हा दाखल राहाता बसस्थानक मारहाण प्रकरणात कोपरगाव पोलीसांसाठी ६४ नवीन निवासस्थानांचे लोकार्पण रामवाडी रक्तरंजित! तरुणावर चाकू-कत्तीने जीवघेणा हल्ला श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थाच्या वतीने शिर्डीत होळी उत्साहात साजरी शिर्डीच्या रामभक्तांची एकमताने हाक-शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय आप्पा शिंदे यांच्यावर रामनवमी उत्सवाध...
Blog

#MaharashtraPolice#CrimeNews# BreakingNews#शिर्डीत 29 लाखांचा प्रतिबंधित मागुर मत्स्यबिज ट्रक जप्त 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल-4 जण ताब्यात-2 फरार

शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करत केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेला सुमारे 4000 किलो मागुर (Clarias gariepinus) मासा जप्त करण्यात आला असून, ट्रकसह एकूण 29,00,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. दिपक मेढे व त्यांच्या पथकाने शिर्डी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दिनांक 03/03/2026 रोजी निमगाव बायपास रोड, नगर–मनमाड महामार्ग येथे ट्रक क्रमांक WB25M5023 ताब्यात घेण्यात आला. ट्रकमध्ये प्रतिबंधित मागुर मासा आढळून आला. ट्रकमधील चार आरोपींनी सदर मासा पश्चिम बंगाल येथून भरून खोपोली–मुंबई येथे नेण्याची कबुली दिली.


त्यानंतर ट्रक शिर्डी पोलीस ठाणे येथे आणून मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांनी पाहणी केली असता, तो मासा केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या आफ्रिकन मागुर (Clarias gariepinus) जातीचा असल्याचे स्पष्ट केले.
केंद्र शासनाचे आदेश तसेच National Green Tribunal, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार या माशांच्या संवर्धन, उत्पादन, विक्री व वाहतुकीस बंदी आहे. तरीही आरोपींनी जाणीवपूर्वक आदेशाचा भंग केला.


कारवाईदरम्यान –
4,00,000/- रुपये किमतीचे 4000 किलो प्रतिबंधित मागुर मासे
25,00,000/- रुपये किमतीचा ट्रक
असा एकूण 29,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष ब्लिचिंग पावडर व मीठ टाकून जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले.


ताब्यातील आरोपी :
स्वपन नियम डे (वय 36)
मकबुल रौफ सरदार (वय 31)
कुतुब आयुब मंडल (वय 35)
मृत्युंजय मुकुल विश्वास (वय 27)
तर मिराज (प. बंगाल) व इमाम भाई (मुंबई) हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.


सदर प्रकरणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 160/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.
🔎 पर्यावरण व स्थानिक मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण करणाऱ्या या अवैध रॅकेटवर पोलिसांनी घातलेला हा मोठा घाव मानला जात आहे.

👮‍♂️ कारवाई करणाऱ्या पथकातील अधिकारी व अंमलदार
मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार व किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने कारवाई केली –
पोउपनि. दिपक मेढे
पोलीस अंमलदार राहुल द्वारके
पोलीस अंमलदार शाहिद शेख
पोलीस अंमलदार फुरकान शेख
पोलीस अंमलदार राहुल डोके
पोलीस अंमलदार सुनिल मालणकर
पोलीस अंमलदार प्रशांत राठोड
पोलीस अंमलदार सतिष भवर
चालक उमाकांत गावडे
उत्तरेश्वर मोराळे
तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोउपनि. सागर काळे व इतर कर्मचारी यांनीही या कारवाईत मोलाची साथ दिली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button