Letest News
शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
Blog

राहाता शहरात पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

राहाता : वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय दर्शविणारा होळी सण शहरात उत्साह, आनंद आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी यावेळी बोलताना होळी हा केवळ सण नसून समाजात सकारात्मकता, प्रेम आणि बंधुभाव वाढविण्याचा संदेश देणारा उत्सव असल्याचे मत व्यक्त केले.
🌼 डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा व राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांनी कुटुंबियांसह होळी प्रज्वलित करून सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी डॉ. पिपाडा म्हणाले की, समाजात प्रेम, ऐक्य आणि सौहार्द वाढविण्यासाठी सणांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि संयमाने होळी व धुळवड साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.


🤝 सौ. ममता पिपाडा यांचा सामाजिक ऐक्याचा संदेश
सौ. ममता पिपाडा यांनीही नागरिकांना होळी व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा देत समाजात सौहार्द जपणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सणांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य अधिक दृढ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

🙏 मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे, नरेंद्र पिपाडा, मदनलाल पिपाडा, सुरेश गरुड, महावीर पिपाडा, सुखदेव गोलांडे, निखील पिपाडा, दीपक गायकवाड, साहील पिपाडा, माया पिपाडा, रामदास येवले, श्रृती पिपाडा-बंब आदी मान्यवर उपस्थित होते. पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न शशिकांतजी निलखे गुरु यांनी केले.
उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात उपस्थितांनी होळी सण साजरा करत सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button