Letest News
रस्त्यावर गुटखा थुंकणाऱ्या तरुणावर कारवाई सर्जेराव कोते पाटील यांच्या जागरूकतेमुळे नगरपालिकेची तातडी... साईनिर्माण परिवार व श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य तीर्थयात्रेला गुरुवारी उत्साहपूर्ण प... समृद्धीवर दरोडा… मागे गुटखा तस्करांचे ‘कनेक्शन’?राहुरीच्या उद्योजकाला लुटणाऱ्या टोळीतील कुख्यात किरण... नव्या जागेवरून सत्ताधारी-विरोधकांत जोरदार जुंपली! चेअरमन विठ्ठलराव पवारांचा विरोधकांवर घणाघात राहाता शहरात मावा-गुटख्याचा काळाबाजार उघड! स्थानिक गुन्हे शाखेचा छापा-तिघांविरुद्ध गुन्हा-अवैध तंबाख... चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख...
क्राईमशिर्डी

शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उधाण

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील गेट क्रमांक ४ समोरील महिला हत्याकांडानंतर समाजात संतापाची लाट उसळली असतानाच कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या घटनेवर काव्याच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या कवितेमध्ये वाढती हिंसक प्रवृत्ती, समाजातील बिघडलेली मानसिकता आणि श्री साईबाबांच्या “श्रद्धा आणि सबुरी” या शिकवणीची आठवण करून देण्यात आली आहे.
“महिलेकडून महिलेचा शिर्डीत खून झाला पहिला”, “फिजाचे धाडस कशामुळे, आता तरी शोध घ्या”, “श्रद्धा आणि सबुरी धरा” अशा ओळींमधून त्यांनी समाजाने या घटनेकडे केवळ गुन्हा म्हणून न पाहता, त्यामागील सामाजिक कारणांचाही विचार करण्याचे आवाहन केले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


कवितेत त्यांनी वाढती हिंसा, धारदार शस्त्रांचा वापर, समाजातील नैतिक अधःपतन आणि राजकीय-सामाजिक मौन यावरही भाष्य केले आहे. या कवितेने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी कवितेतील काही उल्लेखांवर आक्षेपही नोंदवले आहेत.
दरम्यान, शिर्डीतील महिला हत्येप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे.

विजय वहाडणे यांची कविता
महिलेकडून महिलेचा
शिर्डीत खून झाला पहिला
बिनधास्त खून करणारी
फिजा पटेल क्रूर महिला
फिजाचे धाडस कशामुळे
आता तरी शोध घ्या
कुणाचे संस्कार कसे
आता थोडा तरी बोध घ्या
कुणीही निषेध करू नका
मतांमध्ये होऊ शकते घट
ज्यांच्या हाती चाकू सुरे
त्याचीच समाजात वट
अतिरेकी धाडस कशामुळे
खोलात जाऊन विचार करा
श्री साईबाबांची शिकवण
श्रद्धा आणि सबुरी धरा
महिलेकडेही धारदार सुरे
जणू पाकिस्तानात आपण
आता जागे व्हा अन्यथा
नवा देशच होईल स्थापन
विरोधात बोलूच नका
तुम्हाला प्रेमाचा सल्ला
या शांतताप्रिय महिला
तुमच्यावरही करतील हल्ला
— विजय वहाडणे
माजी नगराध्यक्ष, कोपरगाव

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button