Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
राजकीयशिर्डी

सावळीविहीर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ-नागरिक दहशतीत-वनविभाग कुठे झोपला?

सावळीविहीर प्रतिनिधी | अहील्यानगर जिल्हा
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव व राहाता तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून सावळीविहीर परिसरात भीतीचे सावट गडद झाले आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथे पत्रकार विजय खरात यांच्या वस्तीवर सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्तथरारक दृश्यांनी परिसर हादरला आहे. बिबट्याने लॅब्राडोर जातीच्या कुत्र्यावर झडप घालत एक कुत्रा व एक कुत्री फस्त केल्याची घटना समोर आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🎥 सीसीटीव्हीत कैद थरार; दोन बिबटे मुक्तपणे फिरताना स्पष्ट
स्थानिकांच्या मते परिसरात किमान दोन बिबटे मुक्त संचार करत आहेत. रात्रीच नव्हे तर रस्त्यावरही त्यांचा वावर दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर ऊसतोड व मका कापणी सुरू असल्याने बिबट्यांना नैसर्गिक आडोसा कमी पडत असून त्यांनी थेट मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळवला आहे.
विशेष म्हणजे शिर्डी-सिन्नर मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. गुजरात, मुंबई, नाशिक भागातून साईभक्त पायी पालखी घेऊन शिर्डीकडे जात असतात. अशा वेळी रस्त्यालगत बिबट्यांचा मुक्त वावर ही गंभीर बाब ठरत आहे.


🌾 शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती; वीजेचा लपंडाव आणि बिबट्यांचा धोका
परिसरात मका, ऊस, गिनीगवत यांची शेती मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. अंधार, वीजेचा लपंडाव आणि बिबट्यांचा वावर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पशुधन आणि पाळीव प्राणी आधीच बिबट्याच्या तावडीत सापडले आहेत; उद्या एखादा शेतकरी किंवा साईभक्त बळी गेल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

🚨 “बळीची वाट पाहू नका!” – वनविभागावर संतापाचा भडका
घटना घडल्यानंतरही ठोस उपाययोजना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, रात्री गस्त वाढवावी, तसेच परिसरात जनजागृती व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.


“एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त प्रश्न सावळीविहीर परिसरातून उपस्थित होत आहे.
आता तरी वनविभागाने झोपेतून उठून ठोस कारवाई करावी, अन्यथा जनआक्रोश उसळल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button