Letest News
खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका राज्यातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारांना ब्रेक! आता उपचारांसाठी रुग्णांना मोजावे लागणार पैसे शिर्डीत मध्यरात्री थरार! ‘झिंग्या गँग’चा तरुणावर जीवघेणा हल्ला शिर्डीच्या मातीचा जागतिक झेंडा! ‘Future IP Leader Award’ने गौरव लोकचंदानी यांचा सन्मान 24 तासांत न्याय! कर्तव्यदक्ष कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची कणखर व निर्भय कारवाई दबावाला न ज... अहिल्यानगरमध्ये कारवाई… शिर्डीत कधी? ब्लॅक फिल्मविरोधात ४५८ वाहनांवर दंड-नागरिकांचा सवाल तीन पत्ती तिरट जुगार खेळणारे ६ जण ताब्यात-रोख रक्कम-मोबाईल व दुचाकी जप्त
अ.नगरक्राईम

अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील

श्रीरामपुर | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

दिनांक ०४/०९/२०२५ रोजी श्रीरामपुर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयास गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनुसार श्रीरामपुर शहरातील आदर्श लॉज, रंगोली रोड येथे लॉजचा मॅनेजर धीरज प्रमोद बिंगले हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत असून, लॉजमध्ये जागा उपलब्ध करून देत कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

DN SPORTS

kamlakar


या माहितीच्या आधारे श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर व पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पो.नि. नितीन देशमुख, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांनी पोलीस पथक तयार करून बनावट ग्राहक व पंचासह सापळा रचून छापा कारवाई केली.
छाप्यादरम्यान आदर्श लॉजच्या काऊंटरवर धीरज प्रमोद बिंगले (वय ३५, मॅनेजर) हा मिळून आला. तसेच लॉजमध्ये ३ पीडित महिला आढळून आल्या. तपासात मॅनेजर धीरज बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख (रा. बाबरपुरी, श्रीरामपुर – फरार) हे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून ग्राहकांकडून पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले.


या प्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८२३/२०२५ अन्वये स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले असून, लॉजचे चालक व मालक यांचाही थेट सहभाग उघडकीस आला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही दि. १०/०१/२०२४ रोजी याच आदर्श लॉजवर छापा टाकण्यात आला होता व त्यावेळीही गु.र.नं. २०/२०२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, वारंवार कारवाई होऊनही लॉज चालक व मालकांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले.


सदर लॉज हे श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, गणपती मंदिर व नुराणी मस्जिद या धार्मिक स्थळांच्या अगदी नजीक असून, परिसरात निवासी वस्ती, शाळा व महाविद्यालये आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी व भाविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम १८ अन्वये आदर्श लॉजचा परवाना रद्द करून लॉज बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार मा. उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपुर यांनी आरोपींकडून खुलासा मागवला. मात्र, सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने दि. ०९/०२/२०२६ रोजी आदर्श लॉज एक वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे व ७ दिवसांत जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले.

या आदेशानुसार श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनकडून सदर लॉज सिलबंद करण्यात आले आहे. सामाजिक शांतता, नैतिकता व सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले असून, भविष्यातही ज्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे व लॉज चालकांचा सहभाग निष्पन्न होईल, त्या ठिकाणी कठोर कायदेशीर कारवाई करून लॉज/हॉटेल बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.


ही संपूर्ण कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर), श्री. सोमनाथ वाघचौरे (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर) व श्री. जयदत्त भवार (उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन देशमुख व श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button