Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरक्राईम

विठ्ठल–रुक्मिणी मंदिरातील चांदीचे दागिने चोरणारे 2 सराईत आरोपी अटकेत

अहिल्यानगर : हिंगणी (ता. श्रीगोंदा) येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात चोरी करणाऱ्या सराईत मंदिरफोड टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करत ग्रामस्थांच्या भावना जपल्या आहेत. या कारवाईत १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दि. १३ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे गेट तोडून गाभाऱ्यातील विठ्ठल–रुक्मिणी मंदिराशेजारी असलेल्या महादेवाच्या प्रतिकृतीवरील १ किलो ८७३ ग्रॅम वजनाचा, सुमारे १.४८ लाख रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षकांचा आदेश, एलसीबीची धडक कारवाई
मंदिरातील चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोनि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.


तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार भास्कर खेमा पथवे व त्याच्या साथीदारांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सलग चार दिवस पाठलाग केल्यानंतर टाकळी ढोकेश्वर परिसरात सापळा रचून
🔹 भास्कर खेमा पथवे (वय ५०)
🔹 राजेंद्र ठकाजी उघडे (वय ३३)
या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
17 गुन्ह्यांचा मास्टरमाइंड, मंदिरफोडींचा इतिहास उघड
चौकशीत आरोपींनी फरार साथीदार संजय भास्कर गावडे याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. अटकेत असलेल्या आरोपींकडून


✔️ 5.10 लाखांचा चांदीचा मुखवटा
✔️ तवेरा गाडी (5 लाख)
✔️ मोबाईल, रोख रक्कम व हत्यारे
असा एकूण 10.52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुख्य आरोपी भास्कर पथवे याच्यावर अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मंदिर चोरीचे तब्बल 17 गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र उघडे याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आणखी गुन्हे उघडकीस, तपास सुरू
या आरोपींकडून बेलवंडी, पारनेर, राजूर, आश्वी, नेवासा आदी पोलीस ठाण्यांतील अनेक मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करीत आहे.कारवाईत सामील पोलीस पथक
सदरची उल्लेखनीय कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी,
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.


पथकात खालील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते :
पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे
पोलीस अंमलदार गणेश लोंढे
पोलीस अंमलदार विजय पवार
पोलीस अंमलदार संतोष खैरे
पोलीस अंमलदार फुरकान शेख
पोलीस अंमलदार दिपक घाटकर
पोलीस अंमलदार भिमराज खर्से
पोलीस अंमलदार अमृत आढाव
पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ
पोलीस अंमलदार रोहित येमुल
पोलीस अंमलदार आकाश काळे
पोलीस अंमलदार योगेश कर्डीले
पोलीस अंमलदार अरुण मोरे
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली असून, मंदिरफोड टोळीविरोधात मोठे यश मिळाले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button