Letest News
१५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्... ग्रामीण स्वप्नांना सरकारी नोकरीची वाट-शिर्डीच्या साई निर्माण करिअर अकॅडमीमधून ७० जण सेवेत साईनगरीत गुन्हेगारांचा मोकळा संचार! दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून चोर फरार 🚨
अ.नगरक्राईम

राहात्यात गुटखा माफियांचे ‘संरक्षण कवच’?🔥 १.१७ लाखांचा साठा-आरोपी ठरले ‘अज्ञात’ – पोलिसी भूमिकेवर गंभीर संशय

राहाता (प्रतिनिधी):
महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूवर कडक बंदी असताना राहाता तालुक्यात उघडकीस आलेले गुटखा तस्करीचे प्रकरण आता थेट ‘सिस्टम फेल्युअर’कडे बोट दाखवत आहे.
१ लाख १७ हजार ५२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा सापडूनही खरे आरोपी मोकाट, तर गुन्हा दाखल झाला तोही ‘अज्ञात व्यक्तीविरुद्ध’ — या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची छाया गडद झाली आहे.
👮‍♂️ सरकारतर्फे फिर्याद… पण कारवाईत गोलमाल!
राजेश नामदेव बडे (वय ५०), अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अहिल्यानगर यांनी सरकारतर्फे दिलेल्या सविस्तर फिर्यादीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
दिनांक १४/११/२०२५ रोजी राहाता पोलीस स्टेशनच्या सपोनी संगीता गिरी यांनी कोराळे गावात एका बाभळीच्या झाडाखाली टाकलेला प्रतिबंधित गुटखा साठा ताब्यात घेतला.
त्याच दिवशी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली.
❗ मात्र प्रत्यक्ष अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात तब्बल दीड महिन्यांचा विलंब झाला.
📦 जप्त साठा – तस्करी स्पष्ट, तरी आरोपी ‘अज्ञात’?
पंचासमक्ष तपासणीत सापडलेला साठा👇
▪️ हिरा पान मसाला – ₹22,656
▪️ डायरेक्टर पान मसाला – ₹24,840
▪️ विमल पान मसाला – ₹52,272
▪️ व्ही तंबाखू – ₹6,336
▪️ रॉयल 717 तंबाखू – ₹6,096
▪️ शॉट 999 तंबाखू – ₹5,320
➡️ एकूण ₹1,17,520/-
हा सर्व साठा सुगंधित तंबाखू व इतर घातक घटकांचे मिश्रण असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे.
नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे.
🌳 ‘अज्ञात आरोपी’चा बनाव? खरे नाव आधीच समोर!
पोलीस पंचनाम्यात “अज्ञात व्यक्ती बाभळीखाली साठा टाकून पसार” असा उल्लेख आहे.
मात्र हा साठा मूर्तडक यांच्या ताब्यात होता आणि तो ‘बंटी’ याचाच माल असल्याची खात्रीशीर माहिती कळते व थेट आरोप होत आहे.
❓ मग प्रश्न उभा राहतो —
आरोपी माहिती असूनही नाव FIR मध्ये का नाही?
कोणाच्या दबावाखाली ‘अज्ञात’ असा उल्लेख?
गुटखा माफियाला वाचवण्यासाठीच का ही खेळी?
⏳ १४ नोव्हेंबर ते ४ जानेवारी… दीड महिन्याचा विलंब कशासाठी?
✔️ साठा १४/११/२०२५ रोजी ताब्यात
✔️ अन्न प्रशासनाला त्याच दिवशी माहिती
❌ मात्र FIR / अन्न सुरक्षा कायद्यातील कारवाई — ०४/०१/२०२६
👉 या विलंबामुळे
आरोपींना पलायनाची संधी
पुरावे नष्ट होण्याचा धोका
तपास कमजोर होण्याची शक्यता
हा विलंब अपघाती की नियोजित? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
⚖️ कायदा कडक, पण अंमलबजावणी कुठे अडकली?
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गुटखा विक्री, साठा, वाहतूक पूर्णतः बंदीस्त आहे.
या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत
कलम 26, 27, 30, 59 सह गंभीर गुन्हे स्पष्टपणे लागू होतात.
तरीही खऱ्या आरोपींवर थेट गुन्हा दाखल न होणे म्हणजे कायद्याची थट्टा असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
🚨 थेट मागणी – आता वरिष्ठांनी हस्तक्षेप करावा
या प्रकरणात
🔴 पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
🔴 अप्पर पोलीस अधीक्षक
🔴 पोलीस उपविभागीय अधिकारी
यांनी तात्काळ स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून
✔️ मूर्तडक
✔️ बंटी
✔️ व त्यांना मदत करणारे अधिकारी
यांच्यावर कडक गुन्हे दाखल करावेत, तसेच
❗ कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस व अन्न प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
🛑 शेवटचा सवाल – आज नाही तर कधी?
आजून किती पुरावे हवेत?
आज नाही तर उद्या गुटखा माफिया आणखी किती तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार?

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button