Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
राजकीयशिर्डी

साईदर्शनानंतर नाना पटोलेंचा भाजपावर थेट हल्लाबोल “भाजपा हा गुंडांचा पक्ष-महाराष्ट्राचं विद्रुपीकरण सुरू”

शिर्डी | प्रतिनिधी –
नवीन वर्ष महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण आणि गोरगरीबांसाठी सुखाचं, समृद्धीचं जावं, तसेच काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात व देशात सत्ता मिळावी, असे साकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी श्री साईबाबांच्या चरणी घातले. शिर्डीत साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार शब्दांत टीका करत राजकीय वातावरण तापवले.
🙏 साईदर्शन घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की,
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या विचारांवर लढल्या जातात. त्यामुळे महायुती स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीत फारसं वेगळं चित्र दिसेल असं मला वाटत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
🕊️ आम्ही संविधान व सर्वधर्म समभाव मानणारे – पटोले
भाषा व धर्मवादावर बोलताना नाना पटोले म्हणाले,
“आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. सर्वधर्म समभाव आमचा विचार आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भाषा व धर्मावर राजकारण होऊ शकत नाही. काही लोक तसे करत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
💣 अजित पवारांमुळे भाजपाचा खरा चेहरा उघड – घणाघात
भाजपावर जोरदार हल्ला चढवताना नाना पटोले म्हणाले,
“अजित पवारांनी भाजपाचा खरा चेहरा उघड केला आहे. कालपर्यंत 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत घेतले, उपमुख्यमंत्री केले आणि अर्थमंत्री करून राज्याच्या तिजोरीची चावी दिली. म्हणजे ‘तुम्ही पैसे लुटा’ असाच संदेश भाजपाने दिला आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
🚨 निवडणुकांत दबावतंत्र; महाराष्ट्राचं विद्रुपीकरण
महानगरपालिका निवडणुकांआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यावर बोलताना पटोले म्हणाले,
“निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे. उमेदवारांवर दबाव टाकणे, अर्ज मागे घेण्यासाठी गुन्हे दाखल करणे—हे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही,” असे ते म्हणाले.
⚠️ “भाजपा म्हणजे गुंडांचा पक्ष” – थेट आरोप
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून गुन्हेगारांना तिकीट दिल्याच्या आरोपांवर पटोले म्हणाले,
“भाजपा हा आता गुंडांचा पक्ष झाला आहे. केंद्र असो वा राज्य—भाजपाच्या सत्तेत गुंडगिरी फोफावली आहे. हे अनेक ठिकाणी दिसून येत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
✍️ (राजकीय प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button