Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
क्राईमशिर्डी

अर्ज नाही, तारण नाही, जामीन नाही – तरीही कर्ज मंजूर?ठेवी ३ कोटींच्या-तरीही कर्जदार ठरवले –कर्ज न घेताच ६० लाखांचे बोगस कर्ज- ठेवीदारांची खुलेआम फसवणूक

शिर्डीलगत निमगाव कोऱ्हाळे येथील श्रद्धा सबुरी पतसंस्थेत ठेवीदारांची पद्धतशीर फसवणूक झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
विजय व वैभव चोपडा या व्यापारी बंधूंच्या संस्थेत ३ कोटी १८ लाख रुपयांच्या ठेवी असताना, त्यांनी एकही रुपयाचे कर्ज न घेतलेले असतानाही त्यांच्या नावावर ६० लाख रुपयांचे बोगस कर्ज खाते दाखवण्यात आले.
हा प्रकार साधी चूक नसून, संस्थेतील काही जबाबदार व्यक्तींच्या संगनमताने रचलेला आर्थिक कट असल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत आहे.

sai nirman
जाहिरात

२) अर्ज नाही, तारण नाही, जामीन नाही – तरीही कर्ज मंजूर?

या बोगस कर्जासाठी

DN SPORTS

कर्ज मागणी अर्ज नाही

तारण अथवा जामीनदार नाही

स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही

KYC व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नाहीत

असे असताना देखील २३ व २४ नोव्हेंबर २०२० रोजी बोगस व्हाउचरद्वारे ६० लाख रुपये काढण्यात आले.
हे कर्ज मंजुरीची प्रक्रिया नसून नियम, कायदे आणि ठेवीदारांच्या विश्वासाची थेट पायमल्ली असल्याचे स्पष्ट होते.

kamlakar

३) पाच वर्षे मौन, मग थेट १.२१ कोटींची नोटीस – लेखापरीक्षण कुठे होते?

या गैरव्यवहारानंतर तब्बल ५ वर्षे कोणतीही कारवाई न करता, अचानक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी
१ कोटी २१ लाख ३ हजार १२९ रुपयांची नोटीस देण्यात आली.
विशेष म्हणजे,

“पुरावे सादर करा, अन्यथा कर्ज मान्य मानले जाईल”
असा धमकीवजा मजकूर नोटीसमध्ये नमूद आहे.

यामुळे लेखापरीक्षकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली असून,
गेल्या पाच वर्षांचे लेखापरीक्षण नेमके कसे झाले?
एवढा मोठा गैरव्यवहार जाणीवपूर्वक दडपला गेला का?
असे प्रश्न आता उघडपणे उपस्थित होत आहेत.


४) RTI मधून संस्थेची पोलखोल – “कर्जच बोगस आहे” अशी अधिकृत कबुली

माहितीच्या अधिकारात ठेवीदार वैभव चोपडा यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता,
पतसंस्थेचे प्रशासक व जनमाहिती अधिकारी संजय पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून संस्थेची पूर्ण पोलखोल झाली आहे.

उत्तरानुसार –

कर्ज मागणी अर्जच अस्तित्वात नाही

संगणकीय प्रणालीत कोणतीही कागदपत्रे जोडलेली नाहीत

तारण, जामीनदार काहीही नाही

संबंधित व्हाउचर बोगस

हे प्रकरण बोगस कर्ज म्हणून नोंदवलेले आहे

दरम्यान, ४३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात ६ जणांना अटक झाली असून,
अजूनही काही मोठे मासे तपासाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button