शिर्डी :
शिर्डी नगरपरिषद निवडणुकीची अंतिम घडी आता समीप आली असून आज दि. २ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रीयेची सुरुवात होणार आहे. नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. शहरात सुमारे २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान शांततेत पार पडावे यासाठी सर्व स्तरांवर तयारी पूर्ण झाली आहे.
प्रभाग ६ अ ची निवडणूक स्थगित – ६ ब मध्येच मतदान
प्रभाग क्रमांक ६ अ ची निवडणूक स्थगित करण्यात आल्यामुळे आज प्रभाग ६ मध्ये फक्त ६ ब साठी मतदान प्रक्रिया होणार आहे. इतर सर्व ११ प्रभागांमध्ये नियमित मतदान पार पडणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार रिंगणात
नगराध्यक्ष पदासाठी यंदा सात उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
महायुतीतर्फे जयश्रीताई विष्णू थोरात
काँग्रेसच्याउमेदवार
यांच्यासह आणखी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच महायुती, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), पुरोहित गट आणि अपक्ष असे मिळून २३ नगरसेवकांच्या जागांसाठी विविध पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत.
“कायदा मोडल्यास गय नाही” – डीवायएसपी अमोल भारती
शांततेत मतदान व्हावे यासाठी कठोर भूमिका घेत
शिर्डीचे डीवायएसपी अमोल भारती यांनी इशारा दिला आहे की,
“मतदानादरम्यान कुणीही कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास गय केला जाणार नाही. पोलीस प्रशासन सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार होऊ देणार नाही.”
मतदानासाठी ५ प्रमुख केंद्रे सज्ज
शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषद मराठी शाळा
आदर्श विद्यालय
साईनाथ विद्यालय
साईबाबा कन्या विद्यालय
५०० रुम
सर्व मतदान केंद्रांवर पोलीस तैनात असून मतदान यंत्रे कालच दाखल झाली आहेत.
प्रत्येक मतदाराला दोन मतांचा अधिकार
या निवडणुकीत प्रत्येक मतदान यंत्रात —
एक मत नगराध्यक्ष पदासाठी
तर २ मत प्रभागातील उमेदवारासाठी
असे दोन मतांचे विभाजन असणार आहे.
३३,६१३ मतदार आज मतदान करणार
प्रभागनिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे –
प्रभाग १ : १७८९ / १७८८
प्रभाग २ : १५८८ / १५७४
प्रभाग ३ : १४१८ / १४३२
प्रभाग ४ : १३४८ / १४३२
प्रभाग ५ : १३१७ / १३०९
प्रभाग ६ : ८२० / ८५८
प्रभाग ७ : १०६३ / ९६९
प्रभाग ८ : १६८३ / १६७३
प्रभाग ९ : १५९२ / १५९२
प्रभाग १० : १२०८ / १२०८
प्रभाग ११ : २५६६ / २५९५
अन्य : ५
एकूण ३३,६१३ मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत.
कडक पोलीस बंदोबस्त
मतदान निर्विघ्न पार पडावे म्हणून —
१ डीवायएसपी
१ पोलीस निरीक्षक
सपोनि व एपीआय
१२० पोलीस कर्मचारी
गृहरक्षक दलाचे जवान
असा मजबूत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सतर्क
निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर व सहाय्यक अधिकारी सतीश दिघे हे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
कायद्यात राहाल तरच फायदेशीर ठरेल… अन्यथा पोलिसांकडून कोणतीही गय केली जाणार नाही,”
असा स्पष्ट संदेश पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी मतदार व नागरिकांना दिला आहे.
