Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
अ.नगरक्राईम

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफाश-एक जण ताब्यात

श्रीरामपूर :
श्रीरामपूर शहरात अवैध शस्त्रविक्रीचे जाळे उधळून लावत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई करत दोन इसमांना जेरबंद केले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 29 नोव्हेंबर रोजी टॉवर चौक परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी दोघे युवक उभे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली.

sai nirman
जाहिरात

🔥 अचूक टार्गेट — थेट धडक कारवाई

मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांना गुप्तचराकडून मिळालेली माहिती 100% खात्रीशीर असल्याने त्यांनी वेळ न दवडता विशेष पथकाला रवाना केले.
या ऑपरेशनमध्ये पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदळे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांचा समावेश होता.

DN SPORTS

पथकाने पंचांसह मोरगेवस्ती भागात छापा टाकला असता दोन संशयित इसम पळून जाण्याच्या तयारीत आढळले.

🔥 देशी पिस्तूल + जिवंत काडतूस — शस्त्र विक्रीचा कट उघड

ताब्यात घेतलेल्या दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता

एक देशी बनावटीचे पिस्तूल

एक जिवंत काडतूस
जप्त करण्यात आले.

kamlakar

त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून मुख्य आरोपीचे नाव —
साहिल शकिल पिंजारी (वय 23, रा. मोरगेवस्ती, वार्ड नं. 07, श्रीरामपूर) असे आहे.
प्राथमिक चौकशीतून आरोपींनी पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

🔥 शस्त्र अधिनियमाप्रमाणे गंभीर गुन्हा — जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात
गुं.र.नं. 1054/2025
भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 7
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय मुख्य आरोपी साहिल पिंजारीवर याआधीही
गु.र.नं. 08/2025 — भा.दं.वि. 118(2), 115(2), 352, 351(2)(3)
अशा गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

अल्पवयीनाकडे शस्त्र देणे, विकणे किंवा वापरासाठी देण्याबाबत
शस्त्र सुधारणा अधिनियम 2019 नुसार
कलम 25(8), 29 — जन्मठेपेपर्यंत शिक्षा
अशी कठोर तरतूद आहे. त्यामुळे गुन्ह्यात आणखी वाढीव कलमे लावण्यात येणार आहेत.

🔥 अजून कोणाचे नेटवर्क? – तपास वेगात

पोलीस आता या शस्त्राचा पुरवठादार कोण?
शस्त्र घेणारा कोण?
या मागे मोठे रॅकेट आहे का?
याचा सखोल तपास करत आहेत.

🔥 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली
अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे,
उपविभागीय अधिकारी श्री. जयदत्त भवर,
पो.नि. नितीन देशमुख,
सपोनि गणेश जाधव
आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सक्षम पथकांनी केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button