Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

सावधान ! स्वयंपर घोषित पत्रकार आणि चॅनेल संचालकांकडून शिर्डी ग्रामस्थांना ब्लॅकमेलिंगचा विळखा पत्रकार : राजेंद्र भुजबळ

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी पत्रकारिता आज काही ठिकाणी धर्माऐवजी धंदा बनली आहे. साईबाबांच्या पवित्र शिर्डीत सध्या काही स्वयंघोषित पत्रकार आणि लोकल चॅनेल्सनी आपले “पत्रकार” पद हे ब्लॅकमेलिंगचे साधन बनवले आहे. समाजात नाव, प्रसिद्धी आणि पैशासाठी हे लोक साईनगरीतील सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, तसेच लहान अधिकारी वर्गालाही वेठीस धरत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔹 बाहेरील तालुक्यातील तरुणाचा शिर्डीत धुमाकूळ

एक बाहेरील तालुक्यातील तरुणाने शिर्डीत स्थानिक व्यक्तीला हाताशी धरून लोकल चॅनेल सुरू केले. सुरुवातीला त्याने पत्रकारितेचा धर्म जोपासला असला तरी, काळाच्या ओघात त्याचा हेतू बदलला. जिल्ह्यातील प्रतिनिधी पदासाठी १० ते १५ हजार रुपये घेण्याचे व्यवहार सुरू झाले. काही ठिकाणी तर अवैध धंदेवाले आणि गुन्हेगारांशी हातमिळवणी करून महिन्याचा हप्ता मागण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.


🔹 ब्लॅकमेलिंग, दारू, व्येशाव्यवसाय आणि मध्यस्थीचा काळा व्यवसाय

याच चॅनल्सचे काही संचालक शिर्डीत अवैध दारू पुरवठा, गुटखा तस्करी, तसेच काही संवेदनशील गुन्ह्यांमध्ये मध्यस्थी करून लाखो रुपये उकळतात. इतकेच नव्हे, तर महिलांवर विनयभंगाच्या गुन्ह्यांत अडकलेले काही संचालक आजही “पत्रकार” म्हणून फिरत आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्या, प्रॉपर्टी, परदेश प्रवास — हे सर्व एका दशकात कसे शक्य झाले हा शिर्डीकरांचा मोठा प्रश्न आहे.


🔹 साईबाबांच्या पवित्र नगरीत अशा मंडळींना ‘VIP’ दर्जा का ?

या मंडळींची धाडस इतकी वाढली आहे की, ते साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसोबत परदेशात मौजमजा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर दाखवतात. आणि तरीही त्यांना VIP दर्शन पास, आरती प्रवेश आणि विशेष वागणूक दिली जाते — हे ग्रामस्थांच्या मनात संताप आणि प्रश्न निर्माण करणारे आहे. “सत्य बोलणारे पत्रकार वंचित, आणि ब्लॅकमेल करणारे VIP का?” हा आवाज आता गावोगाव उठू लागला आहे.


🔹 प्रशासन आणि राजकारणातील काहींचे मौन संशयास्पद !

प्रशासनाकडून अशा लोकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा केली, मात्र आतापर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे शिर्डीतील सर्वसामान्य जनतेत नाराजी पसरली आहे. काही राजकीय नेते आगामी निवडणुकीसाठी अशा व्यक्तींना साथ देत आहेत, असे आरोपही होत आहेत.


🔹 शिर्डीकरांचा निर्धार — “सत्य आणि प्रामाणिकपणा यालाच प्राधान्य!”

शिर्डीकर आता जागे झाले आहेत. “या साईंच्या दरबारात खोटं टिकणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. अशा ब्लॅकमेल करणाऱ्या, खोट्या पत्रकारांचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे, असा सूर ग्रामपंचायतीपासून ते साईभक्तांपर्यंत सर्व स्तरातून उमटू लागला आहे.


थेट सवाल :

“अशा भामट्यांना उमेदवारी देणार का?
त्यांना VIP मान देणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल!”


भक्ती, सेवा आणि प्रामाणिकतेसाठी ओळखली जाणारी शिर्डी नगरी आज काही खोट्या चेहऱ्यांच्या सावटाखाली आहे. पण जनता जागरूक झाली तर अशा ब्लॅकमेलिंग साम्राज्याचा शेवट अटळ आहे — आणि साईंच्या दरबारात फक्त सत्यच विजयी होईल! 🙏

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button