Letest News
साईनगरीत बोगस आयुर्वेदिक औषधांचा भांडाफोड-भाविकाची ११-४०० रुपयांची फसवणूक महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीच्या शिवावर मास विक्रीवरून तणाव वादातून हातघाई-पोलिसांची तातडीची कारवाई कोपरगावच्या आगीचा इशारा-शिर्डीत गॅस हातगाड्यांचा वाढता धोका? पहाटेच्या काकड आरतीने महाशिवरात्री उत्सवाची मंगल सुरुवात-बेलपत्र अर्पण-शंकर प्रतिमा स्थापना-मंदिर पर... फिर्यादीच चौकशीच्या रडारवर? लेखापरीक्षकांवर ठेवीदारांचे गंभीर सवाल- संचालक-सहकार खाते की ऑडिट यंत्रण... आठ लाखांहून अधिक किमतीची भक्तीची भेट-साईभक्त धनराज मुंडे यांचे भावपूर्ण दान भक्ती-सेवा आणि समाधानाचा संगम!शिर्डी येथे ‘श्री साई परिक्रमा’ उत्साहात-भाविकांसाठी मोफत थंड पेय व पा... आर्थिक ताणात बार व्यवसाय-बाऊन्सर फंड्याला वेग परिसरात नव्या पद्धतीचा ट्रेंड उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीरराज्य शासनाकडून गुणवंत पत्रकारांचा सन्मान महापरिक्रमेचा जल्लोष… पण शहराच्या स्वागताच्या फलकांनी सौंदर्यावर प्रश्नचिन्ह
अ.नगरक्राईम

गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी हद्दपार — श्रीरामपुर पोलिसांची धडक कारवाई!

श्रीरामपुर (प्रतिनिधी)
श्रीरामपुर शहरातील गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीविरुद्ध श्रीरामपुर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या टोळीतील टोळीप्रमुख आणि सदस्य या दोघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

🚓 पोलीस अधीक्षकांचा चार्ज घेताच सलग चौथी कारवाई!

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारताच (मा.) पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे — (IPS) यांनी सलग चौथी हद्दपारीची कारवाई केली आहे.
सदर प्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावावर उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग, श्री. अनिल काले यांनी चौकशी करून शिफारस केली होती.

DN SPORTS

⚖️ टोळीप्रमुख अहमदपुर अब्दुलगणी कुरेशी व एजाज कुरेशी हद्दपार

गुन्हेगारी टोळीप्रमुख अहमदपुर अब्दुलगणी कुरेशी (वय ३७) व सदस्य एजाज कादर कुरेशी (वय ३१) हे दोघेही श्रीरामपुर शहरातील रहिवासी असून, त्यांनी बंदी असलेल्या गोवंशीय मांस विक्रीसारखे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण केली होती.
कायदेशीर कारवाईनंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने पोलिसांनी दोघांनाही अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.


👮‍♂️ धडक मोहीम राबविणाऱ्या पोलीस पथकांचे कौतुक

या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील श्रीरामपुर शहर पोलिसांचे पथक —
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संतोष गायकवाड, पोलीस हवालदार श्री. प्रकाश काळे, पोलीस शिपाई श्री. गणेश कदम, श्री. सागर खेडेकर, श्री. सचिन जाधव, श्री. ज्ञानेश्वर पवार — यांनी परिश्रम घेऊन संपूर्ण माहिती संकलित केली.

या संपूर्ण कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (IPS) व सोमनाथ वाघाचौरे यांनी पथकाचे अभिनंदन केले असून, जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा आणखी कारवाया सुरू राहतील, असे सांगितले.

kamlakar

🔎 अजून गुन्हेगार टोळ्यांवर कारवाई सुरू

अहिल्यानगर जिल्ह्यात शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध, गोवंशीय कायदा आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची माहिती संकलीत करून त्यांच्याविरुद्ध हद्दपारीची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
त्यांनी स्पष्ट केले की —

“अशा सर्व गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करून जिल्हा शांततामय ठेवणे हीच पोलिसांची प्राथमिकता आहे.”

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button