
शिर्डी प्रतिनिधी शिर्डी ही साईबाबांच्या पावनस्पर्शने पुनीत झालेली भूमी आहे येथे देश विदेशातून लाखो साईभक्त भक्तीभावाने दर्शनाला येतात त्या साईभक्तांना नशा करून त्रास देणाऱ्या नशेडी लोकांकडून सुटका मिळावी म्हणून श्री साईबाबा संस्थानचे तात्कालीन कार्यकारी अधिकारी सावंत साहेबांनी सन 1987 साली तत्कालीन मुख्यमंत्री निलंगेकर साहेबांना एक भावनिक लेखी पत्र दिले होते
कि शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना हे नशे करणारे लोकांकडून कश्या प्रकारे त्रास होतो आणि ह्या नशेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी शिर्डीत सुरु असलेले हे वैद्य व अवैद्य व्यसयांना बंदी घालावी तेव्हा मुख्यमंत्री निलंगेकर साहेबांनी घटनेची गंभीरता ओळखून साईभक्तांना त्रास होऊ नये ह्याभावनेने तात्काळ प्रशासनातील अधिकारी यांना सांगून शिर्डीत कायमस्वरूपी दारूबंदीचा ठराव केला होता त्यानंतर शिर्डीत काही वर्ष साईभक्तांना ह्या नशेखोरांनापासून सुटका मिळाली होती परंतु अलीकळच्या काळात शिर्डीत पोलीसाच्या व दारू बंदी विभागच्या आशीर्वादाने शिर्डीत दारूसह गांजा, चरस, आफिम, कुत्ता गोळी, बंटा गोळी तशेच नशेच्या इंजेक्शन्स व व्हाईटणर अशे अनेक प्रकारच्या नश्याच्या वस्तू शिर्डीत सहज व राजरोसपने मिळत आहेत ह्यामुळे शिर्डीत
खून होणे खुणाचे प्रयत्न सह अनेक गुन्हे घडत आहेत याची नोंद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल आहेत व शिर्डीत हे अवैय व्यवसाय सुरु आहेत याचीही नोंद शिर्डी पोलीस स्टेशनला आहे परंतु कायद्याच्या तरतूतीत आहे त्याचा वापर शिर्डी पोलीस करीत नसल्याने येथे ह्या अवैद्य व्यवसायांवर काहीच फरक पडत नाही व आता नवीन आलेल्या नश्यामध्ये बहुतेक मूल अल्पवईन असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करायची कायद्यात तरतुत नसल्याने काही ठिकाणी पोलिसांना ही हतबल होतात
त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली आहे परंतु एक म्हण आहे जर पोलीसांनी ठरवले तर मंदिरा समोरील साधी एक चप्पल सुद्धा चोरी होऊ शकत नाही तर हे अवैद्य व्यवसाय काय चीज आहे त्यासाठी मनाची तय्यारी असली पाहिजे परंतु शिर्डी पोलीसाची मनाची तय्यारी नसल्याने येथे सर्व अवैद्य व्यवसाय राजरोसपाने सुरु आहेत आणि त्यामुळे येथे गुन्हेगारी वाढली आहे आणि शिर्डीत साईभक्त येण्याचे कमी झाले आहेत
काही दिवसापूर्वी शिर्डीत हे नशेच्या वस्तू विकणाऱ्या मुलाला काही जागरूक तरुणांनी पकडून पोलीस स्टेशनला आणले होते परंतु पोलिसांनी काहीच कारवाई न करता तो मुलगा अल्पवयीन आहे असे सांगून त्यास सोडून दिले त्यामुलास ताब्यात घेऊन बालसुधार गृहात पाठवणे गरजेचे होते परंतु ताशे झाले नाही असे प्रकार सध्या शिर्डी पोलिसांकडून सुरु आहेत तेव्हा मेहेरबान साहेबांना विनंती आहे कि शिर्डीत चालणारे हे सर्व अवैद्य व्यवसाय येत्यात आठ दिवसांत कायम स्वरूपी बंद करावे
असे न झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय लहुजी सेना आपल्या मुलाबाळांसह शिर्डी पोलीस स्टेशनं ला मोर्चा आणणार आणि त्यानंतरही हे अवैद्य व्यवसाय सुरूच राहिल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता शिर्डी पोलीस स्टेशनं समोर आमरण उपोषण करणार असल्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या जिल्हाध्यक्ष समीर वीर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सो मा. श्री. मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्य सचिव सो गृह विभाग महाराष्ट्र राज्य
मंत्रालय मुंबई विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र नाशिक पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर जिल्हाधिकारी सो आहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर पोलीस उप विभागीय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी पोलीस निरीक्षक सो शिर्डी पोलीस स्टेशन शिर्डीयांच्याकडे मेलद्वारे केली आहे