साईबाबांच्या पवित्र नगरीत विशेष म्हणजे श्री साईबाबा संस्थान मध्ये कायम असणारे कर्मचारी सावळे बंधुनी संस्थान कर्मचारी सह राज्यातील लोकांची ह्या संपूर्ण कुटुंबियांनी मिळून जास्त पैश्यांचा परताव्याचे दाखवून फसवणूक केली आहे
अमिशे एका वर्षात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून शिर्डीसह विविध जिल्ह्यातील शेकडो गुंतवणुकदारांचे कोट्यावधी रूपये लुटणारा,आरोपी भूपेंद्र सावळे हा अतिशय चतुर चलाख व सराईत गुन्हेगार आहे.
सामान्य गुंतवणुकदाराने कष्टाच्या पैशाची गुंतवणुक केली. कुणी खासगी सावकारांचे कर्ज काढले. कुणी आयुष्यभराची पूंजी पणाला लावली. सावळे याने सर्वांचा विश्वासघात केला. ही संघटीत गुन्हेगारी असुन यांना मकोका अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे व आरोपीकडुन पैसे हस्तगत करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीही भेट घेणार आहोत.
माझ्या माहितीप्रमाणे त्याने व्हाट्सअप वर गुंतवणूकदारांचा ग्रुप तयार केला. त्यामध्ये त्याचे नातेवाईक मित्र वकील या सर्वांना ऍड केले. जर ग्रुप वर कोणी निगेटिव्ह बोलत असेल तर त्याचे मत परिवर्तन करण्यासाठी तो या लोकांचा वापर करत होता. गेल्या डिसेंबर मध्ये शिर्डीत एका हॉटेलमध्ये त्याने या सर्व कामगारांची गुंतवणूक गुंतवणूकदारांची मीटिंग घेतली.
त्यानंतर मोठे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम त्याने जमा केली. त्यानंतर तो जमा केलेल्या रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी गुंतवणुकदाराच्या संपर्काच्या बाहेर गेला. तेथूनच त्याचा खरा डाव सुरू झाला. गुंतवणूकदारांचा भावनेचे भांडवल करून त्याने शेकडो कोटींची रक्कम त्यांच्याकडून घेवुन फसवणुक करुन व पसार झाला.
तो या लोकांना खोटी आश्वासनावर आश्वासने देत गेला व पैसे उकळायचे काम त्याने सुरूच ठेवले. वास्तविक त्याच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल व्हायला हवे होते परंतु परंतु त्याने व व त्याच्या सहका-याने गुन्हे दाखल झाले तर पैसे मिळणार नाहीत असं भावनावश करून फेब्रुवारी ते जून पर्यंत लोकांना काहीच करू दिले नाही. आणि त्या मिळालेल्या वेळेचा त्याने फायदा घेऊन गुंतवणूकदारांच्या रकमेची विल्हेवाट लावली.
हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून जोपर्यंत त्याच्याकडून गुंतवलेल्या पैशाचं पुढे काय केलं याची माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणीही खचून जाऊ नये धीर सोडू नये. त्याला जे करायचं होतं तो ते करून बसला आता पोलिस व न्यायालयाच्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न करणे एवढा एकच मार्ग सर्वांसमोर उरलेला आहे.
आपली फार मोठी फसवणूक झाली आहे हे आता सर्वांच्याच लक्षात आले असून सर्वांनी एकजुटीने एकमताने या आरोपीच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल कराव्यात. तरच पोलीसांच्या माध्यमातून आपण गुंतवलेली रक्कम परत मिळू शकते. याकरिता तक्रारी दाखल होणे गरजेचे आहे.
जे लोक त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यासहित पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल करतील त्यांनाच त्याच्या कडून मिळालेल्या पैशावर हक्क दाखवता येईल असे भाजपाचे जेष्ठनेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे