Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

पंढरपुरातील चंद्रभागेत नदीत बुडणाऱ्या 6 भाविकांना वाचवण्यात यश

पंढरपुरातील चंद्रभागेत अनेक भाविक स्नानासाठी येतात. अशाच स्नानासाठी आलेले ६ जण चंद्रभागेत बुडत होते. नदीत बुडणाऱ्या ६ जणांना वाचवण्यात आलं आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

भाविक चंद्रभागा नदीत बुडत असताना त्यांचा जीव थोडक्यात वाचवण्यात आला आहे. प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी या ६ भाविकांना बुडत असताना नदीतून योग्यवेळी बाहेर काढून वाचवलं आहे. चंद्रभागेत स्नानाला जाणाऱ्या भाविकांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते चंद्रभागेत बुडू लागले होते.

त्याचवेळी कोळी बांधवांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला.उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याचा विसर्ग केल्याने चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पंढपुरात चंद्रभागा नदीत उतरताना भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पंढपुरात अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहे. विठ्ठलाच्या दर्शनाआधी अनेकजण चंद्रभागेत स्नान करतात. अशावेळी नदीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने आतापर्यंत काही भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वी २१ जून रोजी एका तरुण भाविकाचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button