शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथे पैशाच्या लालचेपायीकाही जण येथे काहीही करण्यास पुढेमागे पाहत नाही .म्हणून शिर्डीत अनेक अवैध व्यवसाय व गुन्हेगारी वाढत चाललीआहे. त्याचेच उदहारण म्हणजे शिर्डीत एका हॉटेल मालकाने सर्व नियम धाब्यावर बसवत फक्त पैशाच्या मोहपाई नाशिक जिल्ह्यातील एका मुलीला व कोपरगाव येथील एका मुलाला रूम दिल्याने त्या रूम मध्ये त्या मुलाने त्या मुलीवर बलात्कार केला.
मुलगा कोपरगावचा व मुलगी नाशिक ची परंतु घटना शिर्डीत घडल्याने शिर्डीची त्यामुळे बदनाम झाली असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पिडीत घरकाम मुळ रा. दापुर ता. सिन्नर जि.नाशिक, सध्या रा. हिवरगाव आंबरे ता. अकोले जि. अहिल्यानगर हिने
शिर्डी पोलीस स्टेशनला लेखी फिर्याद दिली आहे की, 30/05/2025 पासुन जय हिंद पोलीस भरती अकॅडमी संगमनेर येथे भरती पुर्व प्रशिक्षणासाठी हिवरगाव आंबरे ता. अकोले येथुन संगमनेर येथे बसने मी येते. मी सन 2018-19 मध्ये एस.एच.एम. कॉलेज, कोपरगाव येथे शिक्षण घेत असतांना माझी आदनान बागवान रा. कोपरगाव याचेशी ओळख झालेली होती. त्यानंतर माझा मोबाईल नंबर 8208479106 यावर आदनान हे नेहमी मला फोन करुन माझ्या सोबत बोलत असे,
दि. 28/05/2025 रोजी मी आदनान यास फोन करुन सांगितले की मी माझे पती पासुन सुमारे दोन महीन्यापासुन विभक्त राहत आहे, त्यामुळे माझे पतीने लग्न करण्यासाठी दुसरी मुलगी पाहण्यास सुरुवात केली आहे. तरी तु तो कोठे मुलगी पाहतो याबाबत माहीती काढ ,असे सांगितले असता तो म्हणाला की,
मी तुझ्या पतीची संपूर्ण माहीती काढतो.दि. 31/05/2025 रोजी सकाळी 09/30 वा. चे सुमारास मी जय हिंद करिअर अकॅडमी संगमनेर येथे असतांना आदनान बागवान हा तेथे आला व मला म्हणाला की, तु माझ्या सोबत चल आपण तुझ्या नव-याची माहीती काढु, असे म्हणाला तेव्हा मी त्यास म्हणाले की तु माहीती काढ मी तुझ्यासोबत येत नाही .तेव्हा आदनान याने मला बळजबरीने त्याचेकडील काळ्या रंगाच्या अॅक्टीवा गाडीवर बसुन घेवुन शिर्डी येथे आला .
त्यानंतर त्याने मला अॅक्टीवा गाडीवर शिर्डी शहरात फिरवले व सायंकाळी 05/30 वा. चे सुमारास मला वॉटर पार्क, शिर्डी येथे घेवुन गेला आणि मला म्हणाला की, माझ्याकडे पैसे नाही, तु येथे थांब असे सांगुन आदनान हा तेथुन निघुन गेला. त्यानंतर तो रात्री 09/30 वा. चे सुमारास माझ्याकडे आला व मला म्हणाला की आता आपण हॉटेल ला जेवण करण्यासाठी जाऊ असे सांगुन त्याने मला एका चायनीजच्या गाड्यावर घेवुन गेला.
तेथे आम्ही चायनिज खाल्ले. त्यानंतर रात्री 10/00 ते 10/30 वा. चे सुमारास आदनान हा मला शिर्डी येथिल हॉटेल राम विठ्ठला येथे घेवुन गेला व म्हणाला की आता रात्र झाली आहे आपण रात्रभर येथेच थांबु असे सांगुन मला रुम मध्ये घेवुन गेला. व पाच ते दहा मिनीट माझ्याशी बोलला .त्यानंतर माझ्या सोबत जबरदस्तीने शरीर संभोग केला.
तेव्हा मी रडु लागले त्यामुळे आदनान याने त्याचा मित्र तन्वीर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व एक अनोळखी मित्र अश्यांना हॉटेलवर बोलावुन घेतले व ते मला म्हणाले की, आता जे झाले ते झाले ते सर्व ईथेच सोडुन दे तुला सकाळी एस.टी. ने तुझ्या घरी पाठवुन देतो.
त्याच दरम्यान मला शोधण्यासाठी माझी ।) आई- वडील मामा- असे शिर्डी येथिल राम विठ्ठला हॉटेलवर आले. तेव्हा माझे वडील आदनान यास म्हणाले की, तु माझ्या मुलीला येथे का घेवुन आला तेव्हा त्याने माझे वडीलांना शिवीगाळ करुन तेथे पडलेला दगड उचलुन उजव्या हातवर मारुन दुखापत केली व आदनान तेथून पळून गेला.
अशा आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 619 /2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 118 ( एक) 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत.