Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव परंतु घाबरून जाऊ नये दक्षता घेणे गरजेचे प्रशासना कडून आवाहन

भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 30 मे 2025 च्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,710 वर पोहोचली आहे.देशात सर्वाधिक सक्रिय कोविड-१ चे रुग्ण केरळमध्ये आहेत. तिथे 1,147 लोकांना लागण झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 467, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 रुग्ण आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महाराष्ट्रात 84 नवे रुग्ण आढळले
महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोविड-19 चे 84 नवीन रुग्ण आढळले आहेत. 84 रुग्णांपैकी 32 रुग्ण मुंबईत आढळले.

ठाणे महापालिका क्षेत्रात 14 रुग्ण, ठाणे ग्रामीण 2 रुग्ण, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत 1, रायगडमध्ये 2 रुग्ण, नाशकात 1 रुग्ण, 19रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात साताऱ्यात दोन रुग्ण, कोल्हापूरात 2 रुग्ण, सांगलीत 3 रुग्ण इत्यादींचा समावेश आहे.

त्यामुळे यावर्षी राज्यात करोनामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या 681 झाली आहे. सध्या राज्यात 467 सक्रिय रुग्ण आहेत.WHO च्या माजी मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “यामुळे घाबरण्याची गरज नाही.

करोना व्हायरस भविष्यातही आपल्यासोबतच राहणार आहे. काही महिन्यांच्या अंतराने कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होईल. आपल्याकडे चांगली रोगप्रतिकारशक्ती आहे. लसीकरणामुळे आपल्याला अधिक संरक्षण मिळते. त्यामुळे करोनामुळे होणारा संसर्ग आता खूप सौम्य आहे.”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button