शिर्डी (प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून २००८ ते २०२४ या कालावधीत सभासदांची ४१ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संस्थेचे २० संचालक व ८ अधिकारी व कर्मचारी अशा २८ जणांविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

आपल्या गुंतवलेल्या रक्कमेवर अधिक परतावा मिळेल या आशेने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील लोकांनी या पतसंस्थामध्ये आपल्या ठेवी ठेवल्या जातात.पण पतसंस्थामधील कोट्यावधीच्या घोटाळ्यांनी त्यांची आयुष्यातली मोठी कमाई वेठीस धरली गेली जाते अशीच घटना राहाता तालुक्यातील निमगाव कोराळे येथील श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत उघड झाली आहे .
यात संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी आदी मिळून २८ जणांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान यातील दोन संचालकांना ताब्यात घेऊन त्यांना कोपरगाव येथील सत्र न्यायालयासमोर हजर केले असता एका संचालकाला ५ दिवसांची पोलीस कोठडी तर दुसर्या संचालकास पोलिस कोठडीचा हक्क राखुन न्यायालयीन कोठडी सुनावली आल्याची माहिती शिर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तथा तपासी अंमलदार रणजित गलांडे यांनी दिली आहे.या घटनेमुळे राहाता आणि शिर्डी परिसरात राजकीय खळबळ उडाली आहे.
याबाबत फिर्यादी सनदी लेखापाल दत्तात्रय बाळाजी खेमनर (रा.कोपरगाव) यांनी श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित निमगांव (को.) ता.राहाता यासंस्थेमध्ये लेखापरिक्षण केले असुन सदर पतसंस्थेत २००८ ते २०२४ या कालावधीत संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी संगणमत करुन या कलावधीमध्ये वेळोवेळी श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगर शेती,सहकारी पतसंस्थेत रोजकिर्द प्रमाणे संस्थेकडे शिल्लक असलेली रोख रक्कम स्वतःसाठी वापरणे,मुदत ठेव तारण कर्ज ठेव रकमेपेक्षा जास्त टाकणे,
मुदत ठेवेची मुदत संपलेली असतांना ती मुदत ठेव कर्ज खात्याला वर्ग न करणे,सभासदांना,ठेवीदारांना मुदत ठेव पावत्या वेळेत न देणे,मुदत ठेव नसतांना मुदतठेव तारण कर्ज नावे टाकणे,बँकेतुन काढलेल्या रकमा संस्थेमध्ये जमा न करणे,मुदत ठेव तारण कर्ज व्याज सुट देणे,इतर कर्ज व्याज सुट देणे,एक रकमी कर्ज भरतांना दिलेली व्याज सुट देणे, भरणा नसतांना बँकेला रक्कम नावे टाकणे,कम्प्युटर सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट न करणे,दिलेली कर्जे,थकबाकी यादी,एन.पी.ए.कर्जे,तारण कर्जे याची सॉफ्टवेअर मध्ये अद्यावत नोंद न करणे
त्यामुळे चुकीची थकबाकी,चुकीचा नफा दाखविणे,चुकीचे एन.पी.ए.दाखविणे या सारखे व्यवहार करुन सहकारी पत संस्थेमध्ये एकुण ४१ कोटी ९७ लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेची फसवणुक,अपहार,गैरव्यवहार करुन सभासद,ठेवीदारांची व पतसंस्थेची अर्थिक फसवणुक केली असल्याचे म्हंटले आहे.
सनदी लेखापाल खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय सीताराम जयराम गाडेकर यांचे चिरंजीव राजेंद्र गाडेकर,विजय चोपडा,बाळासाहेब गाडेकर,यांच्यासह २० संचालक व संस्थेचे व्यवस्थापक अनिल खैरे,सहायक व्यवस्थापक दिपक रांधवणे यांच्यासह ८ कर्मचारी अशा २८ जणांविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदाराचे (वित्तीय संस्थामधील) हित संबधाचे संरक्षण अधिनियम १९९६ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर व बाळासाहेब गाडेकर या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांना कोपरगाव येथील सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने राजेंद्र गाडेकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी तर बाळासाहेब गाडेकर हे आजारी असल्याने त्यांचा पोलिस कोठडीचा हक्क राखुन ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली आहे.
या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनला
गुन्हा रजि नं 1-533/2025 प्रमाणे भा.द.वि कलम 420,406,465,468,364 419,471.120 (ब), 34 सह महाराष्ट्र ठेवीदाराचे (वित्तीय संस्थामधील) हित संबंधाचे संरक्षण अधिनियम 1996 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र सिताराम गाडेकर वय-55 वर्षे रा. निमगांव ता. राहाता बाळासाहेब कारभारी गाडेकर वय 64 वर्षे रा. निमगांव ता. राहाता ज्योती सोमनाथ गाडेकर रा. निमगांव ता. राहाता रंजना गंगाधर गाडेकर रा. निमगांव ता. राहाता भाऊसाहेब साहेबराव जगताप रा. निमगांव ता. राहाता भाऊसाहेब भिमराज चव्हाण रा. निमगांव ता. राहाता रावसाहेब कारभारी कातोरे रा. निमगांव ता. राहाता सागर कैलास गोसावी रा. निमगांव ता. राहाता कै. सिताराम जयराम गाडेकर (मयत) रा. निमगांव ता. राहाता
बाळासाहेब जयराम गाडेकर रा. निमगांव ता. राहाता साईनाथ रावजी गाडेकर रा. निमगाव ता. राहाता निवृत्ती गंगाधर कातोरे रा. निमगांव ता. राहाता विश्वनाथ मुरलीधर गाडेकर रा. निमगांव ता. राहाता सोमनाथ दत्तात्रय गाडेकर रा. निमगांव ता. राहाता बाळासाहेब संपतराव बारसे रा. निमगांव ता. राहाता अशोकराव गोरक्षनाथ सरोदे रा. निमगांव ता. राहाता मथुराबाई बाळासाहेब गाडेकर रा. निमगांव ता. राहाता 19) मिमराज खंड्डु चव्हाण रा. निमगांव ता. राहाता विजय शांतीलाल चोपडा रा. निमगांव ता. राहाता
अनिल तान्हाजी खैरे रा. निमगांव ता. राहाता दिपक रांधवने रा. निमगांव ता. राहात नितिन महाजन रा. निमगांव ता. राहाता शरद नामदेव भोंगळे रा. निमगांव ता. राहाता अशोक मोतीराम उदावंत रा. निमगांव ता. राहात गणेश रंगनाथ खालकर रा. निमगांव ता. राहाता प्रमोद सोपान रांधवने रा. निमगांव ता. राहाता अविनाथ साहेबराव शिंदे रा. निमगांव ता. राहाता
सन 2008 ते सन 2024 पावेतो श्रद्धा सबुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित निमगांव (को.) ता. राहाता जि.अहिल्यानगर. यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या पतसंस्थेत परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी पैसे ठेव म्हणून गुंतवले आहेत. या पतसंस्थेच्या सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी पैशाचा गैरवापर केला असून ठेवीदार यांच्यामधून तीव्र संताप होत आहे.