Letest News
लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद
अ.नगरशिर्डी

साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध!

साई संस्थान त्रिसदस्सीय समितीने बाबांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता शेकडो वर्षांपूर्वीच्या बाबांच्या चरण पादुका भाविकांना दर्शनाकरिता तीन राज्यात घेऊन जाण्याचा ठराव घेऊन निर्णय घेतला आहे. मात्र आता या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थांचा मोठा विरोध आहे तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी विरोध करताना अनेक गोष्टीचा खुलासा करत हे याविषयी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

व त्याची सुनावणी सात एप्रिल रोजी होणार आहे. वास्तविक साई संस्थान प्रशासनाने साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयटी विभाग, जनसंपर्क कार्यालय यांच्या मार्फत वेगवेगळ्या भाषेत आर्टिकल, व्हिडीओ तयार करून ते सर्व देशांमध्ये प्रसारित करण्याची गरज आहे मात्र तसे न करता केवळ श्रीमंत भक्त व काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क असलेल्या विविध राज्यातील खासगी ट्रस्ट यांच्याकडे ह्या पादुका नेण्याचा घाट रचला आहे परंतु या अनुषंगाने फक्त ठराविक भाविकांनाच या पादुकाच्या दर्शनाचा लाभ होणार असून यातून साई संस्थांनला नेमकी कोणता फायदा होणार आहे

हे मात्र कोडंच आहे. कारण देश तथा विदेशात बाबांचे लाखो, करोडो भक्त आहेत त्यामुळे केवळ ठरविक राज्यात ह्या पादुका नेऊन संस्थान नेमकी किती भाविकांना याच दर्शन देणार आहे हे त्यांना माहीत नाही परंतु दीडशे वर्षांहून जास्त कालावधीपासून जतन केलेल्या ह्या पादुका जर बाहेर नेण्यात असल्या तरी त्याची सुरक्षा, पावित्र याचाही मोठा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला असून महाराष्ट्रात असा प्रकार कोणत्याही तीर्थस्थानी होत नाही मंग शिर्डीतच का असा सवाल शिर्डी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी ह्याच पादुका साईबाबांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने 2018 मध्ये शताब्दी वर्ष म्हणून देश विदेशात नेण्यात आल्या होत्या मात्र अनेक देशांच्या विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव ह्याच पादुका वेगवेगळे सुरक्षा रक्षक हताळत असल्याने त्याचे पावित्र भंगले होते तरी सुद्धा त्याकाळी विश्वस्त मंडळाच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होऊनही त्यांनी सर्व नियम व अटी यांचा भंग करत विदेशी वारी करून पादुका नेण्यास सफल झाले.

मात्र आता त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिर्डी. ग्रामस्थांनी या पादुका बाहेरील राज्यात नेण्यास तीव्र विरोध केला असून शुक्रवारी साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.या चर्चेत सकारात्मक निर्णय झाला तर मागील झालेल्या चुका दुरुस्त करून पादुकाचे पावित्र जपले जाईल व कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत या पादुका नेल्या जातील असे आश्वासन गाडीलकर यांनी दिल्याने अखेर ग्रामस्थांनी पादुका नेण्यास सहमती दर्शविली.

यावेळी शिवाजी गोंदकर, अभय शेळके पाटील, कैलास कोते, प्रमोद गोंदकर, सचिन कोते, सचिन शिंदे, सचिन तांबे, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर, सर्जेराव कोते बाबासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button