Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
क्राईमशिर्डी

सावळीविहीर बुद्रुक आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल, दागिने, मोटरसायकल वर भामटे मारतात डल्ला!

राहाता तालुका प्रतिनिधी
(दिगंबर कोते)–
राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक हे गाव नगर मनमाड या महामार्गाच्या कडेला तसेच सात-आठ आसपासच्या गावचे व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे सावळीविहीर बुद्रुक येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र या आठवड्या बाजारात अनेकदा मोबाईल, मोटरसायकल ,महिलांचे दागिने यांच्या चोऱ्या होत असून येथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत किंवा कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही व बाजार करू साठी साधे पिण्याचे पाणी सुद्धा नाही. तरी सावळी विहीर बुद्रुक येथील आठवडे बाजारा मध्ये पावत्या गोळा करून पैसे वसूल केले जातात मात्र सुविधा पुरवल्या जात नाही .त्यामुळे बाजारकरू त्याचप्रमाणे व्यावसायिक ,विक्रेते शेतकरी यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


यासंदर्भात अधिक माहिती अशी की राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक या मोठ्या गावामध्ये दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. परिसरातून वाड्यावर त्या व इतर गावातून येथे शेतकरी भाजीपाला घेऊन येतात व्यापारी येतात व
बाजारकरू येतात ‌.येथे बाजार तळ आहे .या बाजार तळावर अनेक शेतकरी व्यावसायिक दुकानदार विक्रीते आपला माल घेऊन विक्रीसाठी बसत असतात.

पण या बाजार तळात गर्दीचा फायदा घेत अनेकदा गुरुवारी आठवडे बाजारात बाजारासाठी येणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीस गेलेले आहे. त्याचप्रमाणे अनेकांचे मोबाईल येथून चोरी जातात मोटरसायकल चोरी जातात .मात्र बाजार तळामध्ये त्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली गेली नाही.

बाजारतळात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. जे आहे ते कधी चालू तर कधी बंद असतात. त्याचप्रमाणे नगर मनमाड रस्त्याच्या कडेला सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापारी शेतकरी भाजीपाला घेऊन बसतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. अपघात होण्याची मोठी शक्यता असते. मात्र या सर्व गोष्टींकडे येथील ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असून दर गुरुवारी मात्र आठवडे बाजार वसूल केला जातो.

दरवर्षी मार्च महिन्यात या आठवड्यात बाजारच्या वसुलीचे टेंडर दिले जाते. मात्र त्या संदर्भात कोणतेही वृत्तपत्रात किंवा जाहिरात केली जात नाही. आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला बाजार वसुलीसाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे येथे जर गुरुवारी आठवडा बाजारात फक्त वसुली होते मात्र बाजारकरू किंवा ग्राहक विक्रेते व्यावसायिक यांना कोणतीही सुविधा ग्रामपंचायत कडून उपलब्ध होत नाही.

अनेकदा येथून मोबाईल, मोटरसायकल चोरी गेलेल्या असतानाही त्याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे येथील विक्रीते, ग्राहक ,बाजारकरू यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्यांना आठवडे बाजार वसूल करण्याचे टेंडर दिले आहे त्यांनी किंवा ग्रामपंचायतीने या बाजारतळामध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात ,पिण्यासाठी स्वच्छ पाणी, सार्वजनिक शौचालय, तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.

व बाजारात एखाद्या कारणावरून वाद झाला तर तो मिटवण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये दर गुरुवारी तक्रार निवारण कक्ष निर्माण करावा. असे अनेक मागण्या बाजारकरू, विक्रेते, ग्राहक यांच्या मधून होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button