
राहाता शहर व परिसरात काही दिवसांपासुन अवौध धंदे वाढले असुन यावर कुणाचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे. अवौध धंद्यातून येणाज्या पौशामुळे गुन्हेगारी निर्माण होत असुन तिचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा त्रास अनेक सुज्ञ नागरीक, महिला भगिनी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना होतोय. मात्र या विरोधात आवाज उठवण्यास पुढे कोणी धजावत नाही. या अवौध धंद्यावर पोलीसांनी कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

गुन्हेगारी, नशाखोरी यामुळे शिर्डीत खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्या पाश्र्वभुमिवर शिर्डी शहरात व पोलीस स्टेशन हद्दीत अवौध धंद्यांविरोधात पोलीस अॅक्शन मोडवर असुन अवौध धंदे व गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत आहेत.
परंतू राहाता शहर व परिसरात या उलट परिस्थिती आहे. मटका, जुगार, दारु, बिंगो तसेच बेकायदेशीर वाळू उपसा या सारख्या अवौध व सर्व सामान्य युवकांचे कुटूंब उध्वस्त करणारे व्यवसाय राजरोस पणे चालु आहेत. यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत.
हे व्यवसाय कुणाच्या आशिर्वादाने चालतात याचा शोध घेवून त्यांच्या विरोधात सुध्दा कारवाई होणे गरजेचे आहे. गुन्हेगारीस पाठबळ मिळत असुन युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत व यातुन गोरगरीबांचे संसार व प्रपंच उध्दवस्त होत आहेत व गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे राहाता शहर व परिसरामध्ये अशांतता निर्माण होत आहे.
त्यामुळे शिर्डी शहरात अवौध धंदे व गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी उचललेल्या पावलांच्या धर्तीवर राहाता शहरात व परिसरात अवौध चालणाज्या सर्वच धंद्यांविरोधात पोलीसांनी धडक मोहित उभारुन कठोर कारवाई करावी. त्यामुळे नागरीकांचे जीवन अधिक सुरक्षित होईल. या संदर्भात रि.पा.र्इंचा पदाधिकारी म्हणून काही सुज्ञ नागरीकांनी महिला भगिनींनी आमच्याकडे तोंडी स्वरुपाच्या तक्रारी केलेल्या आहेत.
याचा विचार करता राहाता पोलीस स्टेशनने शहरातील सर्वच अवौध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारुन कायमस्वरुपी हे धंदे बंद करावेत अन्यथा लोकहितासाठी व महिला भगिनींच्या सुरक्षिततेकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल. गुन्हेगारी व अवौध धंद्याच बिमोड करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे शिष्टमंडळ देशाचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब व राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटून विनंती करणार आहेत.
प्रसंगी वेळ पडल्यास या विरोधात रि.पा.र्इंच्या वतीने लोकहितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा ईशारा रि.पा.र्इंचे जिल्हाध्यक्ष प्रदिप उर्फ पप्पुभाऊ बनसोडे यांनी दिला आहे. या पत्रकावर तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे, शहर अध्यक्ष राजेंद्र पाळंदे, युवक तालुका अध्यक्ष जितू दिवे,
राहाता युवक शहराध्यक्ष अशपाकभाई शेख, दिपक शिंदे, सुनिल लोखंडे, किशोर दंडवते, तुषार सदाफळ, अमोल भोसले, दत्तू गोडगे, गणेश बनसोडे, जॉन त्रिभुवन, अनिल त्रिभुवन, प्रदिप थोरात, नाना त्रिभुवन, प्रकाश लोंढे, पवन गायकवाड, भिमा बनसोडे, अनिल कोळगे, सचिन कोळगे, गणेश वाघमारे आदिंची नावे आहेत.