Letest News
निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष... आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव
अ.नगरक्राईम

गुंजाळवाडी-वेल्हाळे परिसरात बनावट नोटा छापण्याचे साहित्य जप्त, !

संगमनेर (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील
संगमनेर शहरालगत असणाऱ्या तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी उघडकीस आली. दिल्लीतील तपासादरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे सापडल्याने दिल्ली पोलिसांनी पुणे गुप्तचर विभागाला आदेश दिले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी गुंजाळवाडी परिसरात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संगमनेर शहरालगत असणाऱ्या गुंजाळवाडी-वेल्हाळे रस्त्यावरील एका घरात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा छापून बाजारात आणण्याचा कट रचला जात होता. चायनाहून बनावट नोटांसाठी लागणारा कागद मागवून ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे झेरॉक्स काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, छपाईत त्रुटी आढळल्याने बनावट नोटा कचऱ्यात फेकण्यात आल्या होत्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी छाप्यादरम्यान प्रिंटिंग मशीन, विशेष कागद आणि इतर साहित्य जप्त केले.


या प्रकरणात रजनीकांत राजेंद्र रहाणे (रा. गुंजाळवाडी, वेल्हाळे रस्ता, संगमनेर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने संगमनेरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणेमळा, गुंजाळवाडी या ठिकाणी रजनीकांत राजेंद्र रहाणे हा आपल्या राहते घरी भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवत असलेबाबत गोपनीय माहीती डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्स,

पुणे यांचे पथकाला मिळाली. याबाबत माहिती या विभागाने बाबत संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी शकुणाल सोनवणे यांना कळविली. या माहितीच्या आधारे संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचेसह संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलीस उप-निरीक्षक समीर अभंग, पोना राहुल डोके, पोकों राहुल सारबंदे, पोकों हरिश्चंद्र बांडे हे डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्स, पुणे यांच्या पथकासह घटनास्थळी छापा टाकण्यासाठी धाव घेतली. सदर कारवाई दरम्यान रजनीकांत राजेंद्र रहाणे रा.

राहणेमळा, गुंजाळवाडी याच्या राहते घरी छापा टाकून कारवाई केली. यावेळी त्याच्या ताब्यात असलेले हाय सेक्युरिटी ग्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर करुन एच पी कंपनीचा मॉडेल नं. Smart Tank 585 All in One printer Sr-No-TH4608WOXR या प्रिंटरचा वापर करुन भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे रजनीकांत राजेंद्र रहाणे यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. १२३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७८,१८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपुर, यांचे मार्गदर्शनाखाली कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोना राहुल डोके, पोकों राहुल सारबंदे, पोकों हरिश्चंद्र बांडे यांनी केली आहे. पुढील तपास स.पोनि विश्वास भान्सी करित आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button