Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

महाराष्ट्र केसरीसाठी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये परत होणार कुस्ती –पै.चंद्रहार पाटील

शिर्डी (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथे नुकतीच संपन्न झालेली
महाराष्ट्र केसरी २०२५ ची स्पर्धा वादग्रस्त ठरली होती. अंतिम आणि उपांत्य सामन्यामध्ये झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवराज आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीदरम्यान शिवराजची पाठ न टेकताच त्याला पराभूत घोषित केल्याचा दावा केला जात आहे. त्यावेळी झालेल्या राड्यादरम्यान शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने १६ सेकंद बाकी असताना सामना सोडला होता. दोघांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.मात्र आता पुन्हा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोघांमध्ये कुस्ती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.


पृथ्वीराज मोहोळ याचे अभिनंदन, त्याने खेळण्याची तयारी दाखवली, हे खेळाडूच करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं असल्याचं तो म्हणाला. यातून जे समजायचं ते प्रेक्षक आणि जनता समजली असेल. पृथ्वीराजने घेतलेला निर्णय काय आहे, हे एखादा महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान समजू शकतो.

परत ही कुस्ती सांगली शहरामध्ये लावून दोघांना २५-२५ लाख देऊन त्यांचा योग्य तो सन्मान लावून जनतेच्या मनतील संभ्रम दूर होईल. शिवराजला वाटत आहे. त्याच्यावर अन्याय झाला आणि पृथ्वीराजला वाटत असेल की पंचांच्या निर्णयामुळे आपण महाराष्ट्र केसरी झालो का? या सगळ्याच गोष्टीवर पडदा पडणार आहे.

पृथ्वीराज मोहोळ हा २०२५ चा महाराष्ट्र केसरी असून त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. महाराष्ट्रात जो काही वाद झालेला आहे. तो सांगलीत येऊन थांबवण्याची तयारी आम्ही केली आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये अशा घटना घडू नये. महाराष्ट्रातील कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही सर्वात मोठी आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अशा घटनेमुळे बदनाम होईल. असे होऊ नये. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही महाराष्ट्रातील कुस्तीगीरांमधून बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button