Letest News
शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका! शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्...
अ.नगरक्राईम

पोहेगाव येथील सराफाच्या दुकानावर दरोडा दोन दरोडेखोर जेरबंद दोघांना नागरिकांनी दिला जनता टोला

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पोहेगाव या गावातील ज्ञानेश्वर माळवे नावाच्या सराफाच्या दुकानात भर दिवसा २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५,३०ते ६ वाजेच्या दरम्यान तिन इसमांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी सोन्याचा ऐवज पळून घेऊन जात असताना सराफाची व दरोडेखोरांची झटापट झाली या झटापटीत या सराफाने जीवावर उदार होऊन एका दरोडेखोराला पकडले होते मात्र दुसऱ्याने त्याला शस्त्राचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या प्रमाणावर झालेल्या या गोंधळात पोहेगाव येथील गर्दीतील काही लोकांनी मोठ्या धाडसाने पाठलाग करत या दोन्ही दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळाले

मात्र या झटापटीत उपस्थित असलेल्या जमावाने या दोन्ही दरोडेखोरांना चांगला बेदम चोप दिल्याने पकडण्यात आलेले दोन दरोडेखोर गंभीर जखमी झाले ह्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी गंभीर जखमी झाल्याने त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

या दोन्हीपैकी एक जण जबाब देण्याच्या मनस्थितीत असलेल्या दरोडेखोरांस पोलीसांनी त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव फरार इजाज सय्यद वय ३५ राहणार कोपरगाव आदित्य बागुल वय ३४ राहणार कोपरगाव असे असल्याचे सांगितले या घटनेत सराफ देखील जखमी झाल्याचे समजते या दरोडात किती ऐवज गेला याची माहिती समजू शकली नाही भर दिवसा झालेल्या दरोडेच्या घटनेमुळे पोहेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराटीचे वातावरण पसरले असून हे दरोडेखोर गावात कसे आले होते त्यांना कोणी आणखी मदत केली आहे का

यात आणखी कोणाचा सहभाग आहे का कोणते वाहन वापरण्यात आले याचा देखील शोध सुरू असून या दरोडेखोरांनी या अगोदर कुठे काही गुन्हे केले आहेत का याचा देखील तपास शिर्डी पोलीसांनी सुरू केला आहे या दोन्ही दरोडेखोरावर साईबाबा संस्थानच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक बलैया यांनी दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button