Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरशिर्डी

sonu sud news सापडलेल्या मौल्यवान वस्तू रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांचा अभिनेते सोनू सूद कडून सत्कार व सर्वांचे‌ केले कौतुक!

शिर्डी ( प्रतिनिधी) प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सोनू सूद हे अभिनया बरोबरच सामाजिक कार्यातही नेहमी पुढे असतात. शिर्डीतही त्यांनी असेच एक सामाजिक कार्यात पुढे येऊन संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सापडलेले पैसे ,दागिने, पर्स परत केले होते अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सत्कार सोनू सूद यांनी केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संस्थांनच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सोनू सूद ला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या संस्थान कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवावा व प्रामाणिकपणाची दखल घेत त्यांचा हा स्वतः संस्थांनच्या वतीने सत्कार करत त्यांचे या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले.


नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सोनू सूद साईबाबांच्या दर्शनाकरिता आले होते. सोनू सूद साईबाबांचे निस्सीम भक्त आहे. दर वर्षी शिर्डी ला दर्शनाकरिता येत असतात. सोनू सूद यांना खाकी वर्दी विषयी विशेष प्रेम आहे. साईदर्शना नंतर गेल्या वर्षभरात साईबाबा संस्थान च्या संरक्षण विभाग तसेच इतर विभागाचे प्रामाणिक कर्मचारी यांचे संस्थान सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी श्रीमती जिया शेख यांना दिनांक 02/02/2025 रोजी एक पर्स सापडली त्यात 12,000/- रु होते.

ते त्यांनी प्रामाणिकपणे पणे साईभक्ताला परत केल्याचे तसेच गेल्या शनिवारी देखील सदर महिला कर्मचारी जिया शेख यांना 7390/- रु सापडले होते. ते त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याचे त्यांना संस्थांनच्या वतीने सांगण्यात व अश्या प्रामाणिक कर्मचारी यांचा सत्कार करावा असे संस्थांनचे अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली असता, त्यांनी आनंदाने होकार देऊन श्रीमती जिया शेख यांचा सत्कार केला. तसेच सर्व प्रामाणिक संस्थान कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

सोनू सूद यांच्या अशा सत्कारामुळे संस्थान कर्मचारी अधिक प्रोत्साहित होतील आणि त्यांची कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनीही यावेळी व्यक्त केला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्या कल्पकलेतून असा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांचा संस्थांनच्या वतीने सत्कार करून त्यांना शाब्बासकी दिली जाते .

कौतुक केले जाते. त्यामुळे त्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांबरोबरच इतरांनाही त्यातून स्फूर्ती मिळते व तोही त्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतो असा सिलसिला सध्या संस्थांनमध्ये सुरू झाला आहे व संस्थांनच्या या उपक्रमाचेही कौतुक होत आहे.व प्रामाणिक कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button