Letest News
शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद. अखेर सागर बेगला न्यायालयाचा दणका! तात्पुरता जामीन रद्द अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला २५ गुन्हेगारी पूर... दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक...
क्राईमशिर्डी

सावळीविहीर खुर्द येथे पतंग खेळताना अचानक विहिरीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू!

शिर्डी (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील
सावळीविहीर खुर्द येथे पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एक आठ वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी 25 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे
सावळीविहीर व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या घटने संदर्भात सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील गावामध्ये यश हिरामण सोनवणे (वय वर्ष आठ) हा पहिलीत शिकणारा मुलगा नाताळची सुट्टी असल्यामुळे घरी होता. तो पतंग खेळत असताना जवळच असणाऱ्या व कठडा नसणाऱ्या आणि लक्षात न आलेल्या एका विहिरीमध्ये पडला. त्याच्या समवेत असणारी इतर मुले ओरडल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले . माजी सरपंच महेश जमधडे,

अशोकराव जमधडे , सुधीर वर्पे,यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सागर जाधव यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे एपीआय कायंदे, पो. ना. माळी ,पो. कॉ. झरेकर, दळवी, माळी, सागर जाधव,व साई संस्थान व शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक बंब,हे पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी या मुलाला सुमारे 40 ते 45 फूट पाणी असणाऱ्या या विहिरीत दोर गळ टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र दोन अडीच तासानंतर मोठ्या प्रयत्नाने हा मुलगा या दोर गळाला लागला. मात्र तो मयत झाला होता.त्यानंतर त्यास विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पतंग खेळताना या चिमुकल्याचा जीव गेला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राहता येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी शव पाठवण्यात आले . या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button