Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

संगमनेर मधून सुजय विखेंचा पत्ता कटभाजपाचे खताळ यांना उमेदवारी निश्चित

भाजपचे अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु त्यासाठी त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटात पाठविण्यात आले आहे. मात्र या अकस्मात घडामोडींमुळे संगमनेर भाजपला मोठा धक्का बसला आहे आणि अचानक शिंदेंच्या शिवसेनेला लाॅटरी लागली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आता काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात विरूद्ध महायुतीचे अमोल खताळ अशी लढत रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या मंगळवारी शेवटची मुदत आहे.मात्र संगमनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर कोण याचे निश्चित उत्तर मिळत नव्हते. माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त करीत मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभांचा धडाकाही लावत वातावरण निर्माण केले होते.

थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री यांची पेमगिरीपासून सुरु झालेली युवासंवाद यात्रा आणि माजी खासदार डॉ. विखे यांनी तळेगाव गटापासून सुरु केलेली युवासंकल्प यात्रेने संगमनेर विधानसभा मतदारसंघ ढवळून निघाला होता. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपाने थोरात विरुद्ध विखे असाच सामना होईल असेही कायास लावले गेले, मात्र ऐनवेळी विखे यांनी माघार घेत सरतेशेवटी अमोल खताळ यांच्या गळ्यात संगमनेरची उमेदवारीची माळ टाकण्यात आली.

उद्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खताळ यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान उमेदवार जरी अमोल खताळ असले तरी दोन्ही विखे यांच्या सक्रिय सहभागाने येथील निवडणुक रंगतदार होणार आहे यात शंका नाही.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button