Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा– आयुक्त चित्रा कुलकर्णी

अहमदनगर दि.२० – महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. जनतेला पारदर्शकपणे व विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत लोकसेवा हक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

तहसिल कार्यालय कर्जत येथील सभागृहात तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी, सहायक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके, उप विभागीय अधिकारी नितीन पाटील, तहसिलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, उप विभागीय कृषी अधिकारी आर.बी. सुपेकर आदी उपस्थित होते.

 श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा करण्यात आला आहे.  शासकीय अधिकाऱ्यांनी नोकरी म्हणजे केवळ वेतनापुरती सेवा अशी भावना न बाळगता समाजाप्रती आपलेही काही देणे लागते ही भावना मनी बाळगून सर्वसामान्यांना सेवा द्यावी. जनतेच्या सेवापूर्ततेमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी संवेदनशिलतेने काम करावे. या कायद्याच्या अंमलबजावणीने प्रशासन अधिक गतीमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. विहित मुदतीत उत्तम प्रकारे सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आयोगामार्फत प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना व्यापक स्वरुपात प्रसिद्धी देण्यात यावी. अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपीलीय अधिकारी तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशिलव सेवा कालावधीबाबतची माहिती कार्यालयात दर्शनी भागात लावण्याच्या सुचनाही

श्रीमती कुलकर्णी यांनी यावेळी दिल्या. अधिकाऱ्यांनी अर्ज, अपील यांची तपासणी करून ते विहित वेळेत निकाली काढावेत. सेवा देण्यामध्ये काही अडचणी असतील तर आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button