Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

मोहम्मद पैंगबर त्यांच्याबाबत एवढ्या अश्लील भाषेत बोलताना या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का?’ अमोल मिटकरी

रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. या वक्यव्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आंदोलकांनी रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी केली होती. तसेच काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. या सगळ्या घटनेबाबत बोलताना महायुती सरकारमधील आमदार अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.बांग्लादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत त्याचं कोणी समर्थन करत नाही. पण बांग्लादेशच्या अत्याचाराचा आणि भारताचा संबंध काय? कोण भारतातील वातावरण खराब करतंय.. कोणत्या मुसलमानाने हिंदू धर्माबाबत अपशब्द काढले आहेत? किंवा कोणत्या हिंदूने मुस्लिमांबाबत अपशब्द काढलेत.’आपण हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगत असताना.. हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टी सांगा ना.. अशा पद्धतीने हजरत मोहम्मद पैंगबर.. जे इस्लाम धर्माचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याबाबत एवढ्या अश्लील भाषेत बोलताना या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का?’ अशा लोकांवर कायदेशीर वचक असला पाहिजे. कुठल्याही धर्माची विटंबना करताना.. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो हे या लोकांना माहीत असताना.. असे प्रकार करणं म्हणजे संन्यासाच्या वेषात गुंडागर्दी करण्याचा प्रकार आहे.’ तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्रात असे लफंगे महाराज (रामगिरी महाराज) जन्माला येणं.. मला असं वाटतं की, हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. स्वत: नाव रामगिरी ठेवताना यांना जरा जरी भान का राहिलं नाही?’ जे वक्तव्य केलं ते निंदनीय आहे. मी तर उलट म्हणेन की, अशा व्यक्तीची पाठराखण करू नये. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली याला तात्काळ अटक करावी. जर एखाद्या धर्माबाबत बोलून दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत असेल तर या दंगलखोरीचं मूळ.. जसं मालेगावच्या दंगलखोरीचं मूळ होतं.. तसं या दंगलखोरीचं मूळ हा महाराज आहे का? अशा व्यक्तीवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे.’ अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी रामगिरी महाराज यांच्यावर टीका केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button