Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
शिर्डी

श्री साईनाथ रुग्‍णालयातील नविन अद्यावत अपघात विभागाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न

श्री. साईनाथ रुग्‍णालयातील अपघात व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण सोहळा दिनांक-०८ ऑगस्‍ट २०२४ रोजी सकाळी ११.००वा. श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम) येथे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से व व श्री अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्‍टचे विश्‍वस्‍त श्री संगला शैषाद्री वासु यांचे हस्‍ते पार पडला.
डॉ.अमरा बच्‍चु एम.डी.पी.एच.डी (यु.एस) यांचे स्‍मृती प्रित्‍यर्थ श्री अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्‍टचे संस्‍थापक श्री कृष्‍णा कुमार बच्‍चु यांनी श्री साईनाथ रुग्‍णालयात येथे नविन अद्यावत अपघात विभाग व अतिदक्षता विभाग सुरु करणेसाठी श्री अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्‍टचे वतीने सुमारे १.५ कोटी रुपये देणगी दिलेली असुन त्‍यातुन श्री साईनाथ रुग्‍णालयातील अपघात विभाग व अतिदक्षता विभागाचे निर्मितीचे कार्य पुर्ण करणेत आले.
सदर कार्यक्रमाचे वेळी बोलताना मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या दोन्‍हीही हॉस्पिटलचे उद्दिष्‍ट हे सर्वांना उत्‍कृष्‍ट आरोग्‍य सेवा अत्‍यल्‍प दरात व मोफत पुरविणे हे असुन श्री साईनाथ रुग्‍णालयातील अपघात व अतिदक्षता विभागाच्‍या अद्यावत निर्मीतीमुळे आम्‍हाला उत्‍कृष्‍ट आरोग्‍य सेवा समाजातील गरीब व गरजु रुग्‍णांना प्रदान करणेसाठी मदत होणार आहे. याकरीता त्‍यांनी श्री अमरा बच्‍चु चॅरिटेबल ट्रस्‍टचे श्री कृष्‍ण कुमार बच्‍चु यांचे आभार व्‍यक्‍त करुन त्‍यांचे वतीने आलेले विश्‍वस्‍त श्री संगला शैषाद्री वासु व श्री पंढरीकाश्रय अंकम्‍म कोम्मिनेनी यांचा शाल श्रीफळ व श्रींची मुर्ती देवुन सन्‍मान केला आहे.
सदर उद्घाटन प्रसंगी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग भिकन दाभाडे, प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, साईनाथ रुग्‍णालयाच्‍या प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, उप कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दिनकर देसाई, प्र.कामगार अधिकारी रविंद्र नवले, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष, सहा.अभियंता बांधकाम विभाग गणेश कोराटे, जनसंपर्क अधिकारी रुग्‍णालये सुरेश टोलमारे, बायोमेडीकल इंजिनिअर श्रद्धा कोते, प्रणाली कांबळे, तुषार कुटे, अधिसेविका नजमा सय्यद, मंदा थोरात, यासह दोन्‍हीही हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक साईनाथ रुग्‍णालयाच्‍या प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले तर सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रुग्‍णालये सुरेश टोलमारे यांनी केले व बायोमेडीकल इंजिनिअर प्रणाली कांबळे यांनी आभार मानले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button