Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
अ.नगरक्राईम

कोल्हापूर कडून शिर्डीला येणाऱ्या चौघांना शस्त्राचा धाक दाखवून लुटले

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नगर तालूका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कामरगाव घाटात कोल्हापूरहून शिर्डीकडे जात असलेल्या चौघांना रस्त्यात अडवून अनोळखी तिघा जणांनी कोयता आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळच्या सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम असा ३ लाख 28 हजारांचा ऐवज लंपास करून सुपा परिसराकडे धूम ठोकली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

आज (दि. १) पहाटे साडेतीनच्या दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गणेश मोहन शिंदे (रा. कदमवाडी, ता. करवीर जिल्हा – कोल्हापूर) यांनी फिर्यादी.

या फिर्यादीत म्हटलं आहे, की फिर्यादी शिंदे यांचे मित्र विरेंद्र प्रभाकर सावंत यांचा मुलगा आठ दिवसांपासून हरवला होता. तो शिर्डी येथे सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांच्या माहितीनुसार हरवलेल्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी फिर्यादी शिंदे, त्यांचे मित्र विरेंद्र सावंत, नितीन मनोहर सावंत आणि चालक शिवाजी शंकर राठोड हे सर्वजण काल (दि. ३०) सायंकाळी कोल्हापूरहून शिर्डीकडे इनोव्हा कारमधून (क्र. एम एच. ०९ जी. एफ. ००५०) जायला निघाले. पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी हे सर्वजण सुपा ओलांडून कामरगाव परिसरात आले असता लघवीसाठी थांबले होते.

अचानक त्या ठिकाणी विना नंबरच्या पल्सर या दुचाकीवरुन अनोळखी तिघेजण आले आणि हातातल्या कोयता, चाकूचा हात दाखवत फिर्यादी शिंदे यांच्या हातातल्या बोटांत असलेल्या वेगवेगळ्या राशींचे खडे असलेल्या 15 ग्रॅमच्या अंगठ्या, गळ्यातली तीन तोळ्यांची सोन्याची चैन त्या तिघांनी हिसकावून घेतली. फिर्यादी शिंदे यांचे मित्र नितीन सावंत यांच्या गळ्यातली एक तोळ्याची सोन्याची चैन आणि ८ हजार रुपये रोख रक्कम, दुसरे मित्र विरेंद्र सावंत यांच्या बोटांतल्या प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, सॅमसंग कंपनीचं स्मार्ट वॉच असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते तीन अनोळखी चोरटे विनाक्रमांकाच्या पल्सर या दुचाकीवरुन पसार झाले

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button