Letest News
पत्रकारीता क्षेत्रात शौकतभाई शेख म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्... मागील भांडणाच्या कारणावरून एका कुविख्यात गुंड्याने केले गोळीबार श्रीरामपूर शहर हादरले  थायलंड येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये शिर्डी चा निलेश वाडेकर याने मिळवले ब्रांझ मेडल कोट्यावधिचे मुद्देमाल जप्त करत नगर गुन्हे अन्वेषण पथकाने केली कामगीरी भारी !! शरद पवारास जिल्हाधिकारी साहेबांचा चांगलाच हिसका ! शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या दोन टोळयांमधील 4 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद शिर्डी वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून कारवाई पोलीस निरीक्षक महेश येसेकर देह व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी केले चार हॉटेल सील हॉटेल् सील झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ गणेशोत्सवात ‘बाप्पाच्या गप्पा’ उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती
क्राईमशिर्डी

पोलिसांचा धाक राहिला नसल्याची जनमाणसात भावना शिर्डीची सुरक्षा साई भरोसेच

सदर चोरी करतांना चोरट्यांनी चोरीची मोडस बदलून घेत विना नंबरच्या मोटरसायकलवर दोघेजण तोंडाला मास्क लावून आले..जनरल स्टोअर च्या शेजारील वडापावच्या दुकानातील महिलेकडे 15 वडापाव पाहिजे अशी मागणी केली अणि दुचाकी वरील दुसऱ्याने मात्र दुचाकी सज्ज ठेवली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

आणि एकाने त्यानंतर शेजारील जनरल स्टोअर मधील महिलेच्या दुकानात वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने चक्क गळ्यातील साडे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र दुकानातून ओढून नेले हा सर्व प्रकार त्या महिलेच्या 2 ते 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलीच्या डोळ्यादेखत घडल्याने ती महिला आणि तिची लहान मुलगी सुद्धा अचानक झालेल्या अनपेक्षित प्रकाराने पूर्णपणे भेदरून गेल्या होत्या घटनेनंतर अक्षरशः वेड लागल्यागत दोघींनी टाहो फोडला होता याबाबत शिर्डी पोलिसात त्यांनी तक्रार देखील दाखल केली असून शिर्डी पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 0329/2024 नुसार भारतीय दंड संहिता 1860चे कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

kamlakar

त्यानंतर पुन्हा आज सकाळी सकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास हॉटेल साईश शेजारील रस्त्यावरून महिला भाविक साई दर्शनाला जात असताना मोटासायकलवर मास्क लावून आलेल्या दोघा चोरट्यांनी तिच्या गळ्यातील दोन ते अडीच तोळे वजनाची सोनसाखळी ओढून नेली यावेळी महिलेच्या गळ्याला चोरट्यांच्या हाताची नखे सुद्धा ओरबाडली गेली आहेत सदर चोरटे अंधुकपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

मात्र सततच्या घटनांनी भाविकांच्या आणि नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करत या चोरट्यांना जेरबंद करणे गरजेचे असून सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील रोष वाढत असल्याचे दिसून येत आहे तसेच शिर्डीतील नेतेमंडळींनी सुद्धा आता याबाबत गंभीर पाऊले उचलणे गरजेचे आहे

आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती देत सत्य परिस्थिती बाबत अवगत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे आणि शिर्डीची बदनामी करणाऱ्या या घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button