Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
शिर्डी

सावळीविहीर फार्म शाळेत बाल आनंद बाजार ….

सावळीविहीर प्रतिनिधि विजय खरात/-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक सावळीविहीर फार्म शाळेत सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुकताच बाल आनंद बाजार झाला या माध्यमातून लहान मुलांना शाळेत असताना खरेदी विक्रीचे व्यवहार कसे केले जातात यांचे ज्ञान मिळावे हा हेतू व उद्देश ठेवून शाळेतील मुख्याध्यापक संदिप घोलप सर यानी शिक्षक योगेश बोरसे यांच्या सहकार्याने बाल आनंद बाजारसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मुलांना व्यावसायिक मार्गदर्शन केले तसेच लहान चिमुकल्या मुलांनी खाद्यपदार्थ फळे फुले भाजीपाला शालेय वस्तू शोभेच्या वस्तू खेळणी विविध प्रकारच्या वस्तूंचा बाजारात समावेश करण्यात आला होता लहान चिमुकल्यांनी वस्तूंची विक्री केली या बाजारात मोठ्या संख्येने पालक शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते चिमुकल्याचा चेहरा आनंदी व समाधानी दिसून येत होता तसेच मुलांची रांगोळी प्रदर्शन व महिला पालक हळदी कुंकु आयोजित कार्यक्रम होता यावेळी सरपंच सौ.अर्चनाताई क्षिरसागर ,माजी सरपंच अशोकराव जमधडे, पो.पा.राजेंद्र जमधडे, साईनाथ झिंजाड जालिंदर खरात, पत्रकार विजय
खरात , अर्चनाताई क्षिरसागर म्हणाल्या की या माध्यमातून आपण चांगल्या विचारांचा वान घरी घेऊन जाणार आहे आशाताईंनी आरोग्याविषयी महिला व मुलींना मार्गदर्शन केले. सौ.कुलकर्णी ताईंनी मुले कशी घडवावी याबाबत मार्गदर्शन केले व शेवटी ग्रामपंचायत सदस्या सौ.महिमाताई झिंझाड यांनी महिला पालकांनी मुलांना आवडीनुसार मार्गदर्शन करावे असे सांगितले शेवटी बोरसे यांनी आभार मानले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button